
इतिहासातील काही कागदपत्रांवरून नवा समाज ओबीसीमध्ये आणण्याचा निर्णय हा अन्यायकारक ठरू शकतो. या जी.आर ची वैधता किती आणि संविधानिक कसोटी वर हा जी.आर किती खरा उतरणार तसेच पुढील न्यायालयीन लढाई साठी कशा पद्धतीची रूपरेषा असावी, या करिता ओबीसी वकील मंडळीची महत्त्वाची बैठक रविभवनात पार पडली.
ओबीसी संघटनांना न्यायालयीन लढाईत सहकार्याची ग्वाही देण्यात आली.
हैदराबाद गॅझेटचा दाखला देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न हा ओबीसी समाजाच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे. ओबीसी आरक्षण हे मागासलेपणाच्या आकडेवारीवर आणि सामाजिक वास्तवावर आधारित आहे. ओबीसीसाठी प्रामाणिक पणे काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर बाबी समजून सांगून एकसूत्री रुपरेषा ठरवून शांततेने व परिणामकारक कसे काम करता येईल, यावर वकील मंडळीचे, काय म्हणणे आहे ते समजून घेण्याकरिता ही बैठक आयोजित केलेली होती.
ओबीसी आरक्षणाला नुकसान नाही असे म्हणून चालणार नाही चोर वाटेने आपल्या आरक्षणावर गदा येऊ नये. व पुढे असे जी. आर निघून ओबीसी प्रवर्ग संभ्रमित व भयग्रस्त होऊ नये, याकरिता खालील ठराव ओबीसी वकील महासंघाने या बैठकीत पारित केले.
असे झाले ठराव
1.शासनाने तात्काळ जातीनिहाय जनगणना करून
50% ची मर्यादा हटवून प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.
2.शासनाने मराठा आंदोलकांच्या दबावाखाली मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा GR तात्काळ रद्द करून ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करावे.
3.ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी कुठलीही कायदेशीर अडचण सोडविण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व प्रामाणिक ओबीसी संघटनांना ओबीसी वकील महासंघ कायदेशीर मार्गदर्शन करेल व उच्च न्यायालय ,सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढेल.
4. रस्त्यावरच्या व कायदेशीर लढाईसाठी ओबीसी वकील महासंघ सर्व प्रामाणिक ओबीसी संघटनांच्या सोबत राहील.
5. ओबीसी प्रवर्गातील मोठ्या जातींबरोबरच ओबीसीतील सूक्ष्म ओबीसी यांच्या वर अन्याय होऊ नये यासाठी सुद्धा ओबीसी वकील महासंघ बांधील राहील.
या बैठकीला अध्यक्ष म्हणून ॲड. किशोर लांबट, अधिवक्ता सर्वोच्च न्यायालय होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून ॲड. नरेंद्र गोंडाने ,ॲड. दिनेश धोबे, डॉ.आनंद मांजरखेडे,ओबीसी मुक्ती मोर्चा संस्थापक अध्यक्ष नितीन चौधरी,ओबीसी युवा अधिकार मंच आयोजक उमेश कोर्राम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ॲड विनोद खोबरे तसेच प्रास्ताविक व संयोजन ॲड.समीक्षा गणेशे यांनी केले. आभार ॲड जितेंद्र हिंगवे यांनी मानले.कार्यक्रमाला
ॲड.मनोज साबळे,वंदन गडकरी, ॲड.नितीन रूडे, ॲड तरुण परमार, ॲड.प्रभाकर भुरे,सुषमा भड, अर्चना बरडे, ॲड. रेखा बारहाते, ॲड रवींद्र विलायतकर,ॲड.राहुल वाघमारे, ॲड.सौरभ राऊत, मोबिन खान, ॲड शैला कुरेशी, ॲड लक्ष्मी मालेवार,मुशहीद.खान, ॲड. दीपाली गुडदे, ॲड.मुकुंद आडेवार, ॲड.सुमित लाडवीकर, अँड देवेंद्र यादव, अँड.ओमप्रकाश यादव. ॲड तेजस दाढे, ॲड. अभय जैस्वाल, ॲड नंदा चोपडे, ॲड. सुबिया खान उपस्थित होते.