
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यांमध्ये बुधवार (17 सप्टेंबर) पालकमंत्र्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वाटप केले गेले. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. देण्यात आलेली प्रमाणपत्र आधीच शोधून ठेवली होती का? ती योग्य तरी आहेत का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला.