
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक- अवधूत शेंद्रे
—————————————-
—————————————-
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील
तळेगाव(शा पंत) येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तळेगाव येथील शहीद स्मारक परिसरात सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. या विशेष उपक्रमात ७५ झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी उपस्थित कार्यकर्त्यांनी स्विकारली.कार्यक्रमाची सुरुवात स्मारक परिसरातील कचरा गोळा करून करण्यात आली. आधी संपूर्ण जागा स्वच्छ करण्यात आली आणि नंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच शहीद स्मारक परिसर हरित व स्वच्छ ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे विशाल गाडगे, रुपेश बोबडे, विनोद डोंगरे,विनोद मुळे,शरीफ पठाण,,ईश्वर सहारे, नवाज खा पठाण,सुरज पीठेकर, मयूर वानखडे, सुनील इंगळे, विकास कोठे, पुरुषोत्तम मोरखडे,निलेश पटले,सुनील धोटे,नितीन वानखेडे,विजय सोनटक्के,हेमंत टर्के,अतुल टर्के,अक्षय लठी, आदी मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी मिळून झाडांची काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.या उपक्रमामुळे तळेगावातील शहीद स्मारक परिसरात पर्यावरण संरक्षणाबरोबरच स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचा एक आदर्श निर्माण झाला असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले