
दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कुसुमताई सभागृह नांदेड येथे उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या कौतुकास्पद , उत्कृष्ट रित्या गुन्हे निर्गती , ई- साक्ष ( डिजीटल पुरावा ) व हारवलेल्या पुरुष व महिला यांचा शोध कार्य उल्लेखनीय केल्याबद्दल पोलिस प्रशासन आणि मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
उस्माननगर पोलीस स्टेशनचे सपोनी संजय निलपत्रेवार यांनी मागील अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनात” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या ब्रीद वाक्याचे पालन तंतोतंत करताना पहावयास मिळतात. सपोनि निलपत्रेवार यांनी पोलीस दलात सेवा करताना जटिल गुन्हे त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्याचा हातखंडा असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात यशस्वी कामगिरी व कर्तव्य बजावले आहे.
उस्माननगर पोलीस स्टेशन मधील महीला व पुरुष पोलीस अंमलदार, यांना सोबत घेऊन त्यांना प्रोत्साहीत करून उत्कृष्ट कौतुकास्पद काम केलेले आहे. सपोउपनि व महीला व पुरुष पोलिस कर्मचारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील विविध जटिल गुन्हाचा शोध घेण्यात यश मिळाले आहे.
माहे ऑगस्ट २०२५ या महिन्यात एकुण १५ हारवलेल्या पुरुष व महिला यांचा त्यांनी शोध घेतला आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पोलिस प्रशासन व दिग्गज नेत्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने दि.१७ सप्टेंबर रोजी कुसुमताई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सपोनि संजय निलपत्रेवार यांचा स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण , राज्यसभा खासदार अजित गोपछडे , आमदार बालाजी कल्याणकर , बाबुराव कदम , विधान परिषद आमदार हेमंत पाटील, राज्य संघटन मंत्री संजय कौडगे , व नांदेड जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या प्रमुख हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रूजू झाल्या पासून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहेत.
सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा गौरव सलग तिसऱ्यांदा मान्यवरांच्या हस्ते झाल्याबद्दल उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी ,पोलीस पाटील, सरपंच यांच्यासह मित्र परिवारा तर्फे अभिनंदन करून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.