
राहुल गांधींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली होती.
ती आता मान्य करण्यात आली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर टीका करताना, केंद्र सरकार ने घेतलेला निर्णय क्रांतिकारक असल्याचे म्हटलं आहे. तसेच काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही यामुळे आता राहुल गांधींनी टीका करू नये, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
जातनिहाय जनगणनेच्या निणर्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक झाली. यावेळी महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले असून जातीय जनगणना आणि उसाच्या FRPत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच नरेंद्र मोदी सरकारचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा भविष्यात जातव्यवस्था संपूष्टात आणण्यास मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मोदी सरकारकडून शिलाँग-सिलचर महामार्गाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले असून मेघालय आणि आसामला जोडणाऱ्या शिलाँग-सिलचर महामार्गाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. हा महामार्ग 166.8 किलोमीटर लांबीचा असून 22,864 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राने मंजुरी दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर बैठकांचा सपाटा! मोंदींनी उस उत्पादकांसाठी घेतला मोठा निर्णय; FRPत 15 रूपयांची वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा झाली असून काही निर्णयही झाले आहेत. दरम्यान जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून FRPत 15 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. याबाबची माहिती सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
केंद्र सरकारने मोठा निर्णय! जगणननेसोबतच जानिहाय जनगणना होणार
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून जगणननेसोबतच जानिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीला खिंडार, गुलाबराव पाटलांचा चिमटा
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खानदेशातील राजकारण तापले असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने येथे महाविकास आघाडीला खिंडार पाडले आहे. आजी-माजी मंत्री, बडे नेते अजितदादांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करत आहेत. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अहिराणी भाषेत गण म्हणत शुभेच्छा देताना टोला लगावला आहे. त्यांनी खानदेशात सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेशावर प्रतिक्रिया देताना, प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होईल असे नाहीये. ते कशा करता जाताहेत हे आख्या जगाला माहिती आहे, असा टोला लगावला आहे
जामिनाचा अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीमध्ये केली वाढ
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले च्या विरोधामध्ये शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले ने बावी येथील ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत सतीश भोसले न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत पूजा करुन सपत्नीक ‘गृहप्रवेश’
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण ते वर्षा बंगल्यावरच राहत होते. आता, देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत.
ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली
ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, असं शरद पवार यांनी म्हटले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदीर उभारण्यात आले. आज या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी! निवृत्त मेजर जनरल यांचं मोठं भाकीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसेच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेत लष्कराला फ्री हँड दिला. तसेच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यावर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य जे काही करेल, ते भयावह असेल आणि कदाचित पाकिस्तानची शकले पडतील. आधीच्या सर्जिकल आणि एअर स्ट्राइक मध्ये “एलिमेंट ऑफ सरप्राईज” होता. मात्र आता पाकिस्तानविरुद्ध आता जो होईल ते सर्जिकल व एयर स्ट्राइकच्या पुढचा असेल, म्हणजेच तो कदाचित अर्ध किंवा पूर्ण युद्ध अशा स्वरूपाचा असेल, अशी शक्यताही निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली.