
काकाने वडिलांना फसवलं; आई प्रेग्नेंट होती तेव्हा…
‘बिग बॉस 19’ मध्ये स्पर्धक आता घरात त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठे खुलासे करताना दिसत आहेत. आता स्पर्धक अमाल मलिक याने देखील खसगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
ज्यामुळे मलिक कुटुंबाचे वाद चव्हाट्यावर आलेत. ‘बिग बॉस’ मध्ये जवळचा मित्र बसीर अलीला अमालने आई – वडिलांसोबत झालेल्या अन्यायाबद्दल सांगितलं आहे. कुटुंबाने अमालच्या आईसोबत देखील वाईट वर्तन केलं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमाल मलिक याने केलेल्या मोठ्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
वडिलांची काका अनू मलिकने केली फसवणूक…
अनू मलिकला काळ्या मनाचा म्हणत अमाल म्हणाला, ‘मी माझ्या वडिलांना अनेक वेळा असहाय्य परिस्थितीत पाहिलं आहे. माझ्या वडिलांना एक गाणं रेकॉर्ड करण्यासाठी स्टूडिओमध्ये बोलावलं होतं. बाबा त्यावेळी यारी रोड स्थित एका म्यूझिक शॉपमध्ये जात होते. माझ्या वडिलांनी जे गाणं रेकॉर्ड केलं होतं. ते गाणं उदित नारायण यांच्या आवाजात वाजलं. जेव्हा माझ्या वडिलांनी दुकानदाराला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं तीन वर्ष जुन्या सिनेमातील गाणं आहे… अनू मलिकने वडिलांकडून मॉक रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर गाणं उदित नारायण यांच्या आवाजात आलं. त्यावेळी अनूने पप्पांना असं दाखवलं की जणू तो त्यांना काम करण्याची संधी देत आहे.
प्रेग्नेंसीमध्ये आईने खूप काही सहन केलं…
अमाल म्हणाला, ‘जेव्हा आई गरोदर होती तेव्हा तिने अनेक समस्यांचा समाना केला. लोकं म्हणतात मी खूप शिव्या देतो. मी खूप मानसिक आघात सहन केला आहे. आई गरोदर असताना तेव्हा तिच्यावर खूप अत्याचार झाले. आम्ही त्यावेळी एकत्र कुटुंबात राहत होतो म्हणून तिच्याकडून घरातील खूप काम करून घ्यायचे. एके दिवशी आईने रागाने कपाटावर हात आपटला. आज आपण जिथे आहोत ते फक्त आणि फक्त आईमुळे आहोत. ‘
अमालवर भडकली गौहर
गौहर खानने नुकताच बिग बॉसबद्दल अमाल मलिकवर आपला राग व्यक्त केला. गौहरने अमालच्या गैरवर्तनावर आक्षेप घेतला आणि त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी केली. एवढंच नाही तर, अभिषेक बजाजला बैलाच्या मेंदूचा मुलगा म्हणल्याबद्दलही त्यांनी खूप राग व्यक्त केला.