
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी देविदास पुंडे
कोरेगाव भीमा :
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा TDF, पुणे जिल्हा शिक्षिका संघ, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ तसेच पुणे जिल्हा शिक्षकेतर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणाऱ्या पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोरेगाव भीमा येथील शिक्षिका सौ. वर्षा धर्मराज वाजे यांना सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत, तसेच अध्यापनातील नवीन उपक्रमशीलता याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ कोरेगाव भीमा तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्यावतीने सौ. वाजे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.