
दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी समिर शिरवडकर
राजापूर :- दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत पुरुषोत्तम भानू खांबल यांची सलग पाचव्यांदा महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
धोपेश्वर पंचक्रोशी मध्ये कोणत्याही प्रकारचा तंटा अतिशय आत्मियतेने आणि कुशलतेने मिटविण्यात पुरुषोत्तम खांबल हे कुशल असल्याचे बोलले जाते. पुरुषोत्तम खांबल हे तंटामुक्ती बरोबरच सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरण तसेच दारूबंदी यासाठी तन मन धनाने अग्रेसर आणि आक्रमकपणे काम करत असतात. पंचक्रोशी मधील शैक्षणिक तसेच विकास यासाठी सदैव आग्रही आणि प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.
याबाबत धोपेश्वर येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असता आमच्या पंचक्रोशीतून एक युवा नेतृत्व उदयाला येत असल्याची भावना व्यक्त झाली. पंचक्रोशीतील अनेक चुकीच्या गोष्टींना वाचा फोडून त्यांनी ग्रामस्थांचे हित साधले आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त कारभार चालण्यासाठी अटोकाट आणि प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
पुरुषोत्तम खांबल हे तंटामुक्ती समिती, सामाजिक कार्य याबरोबरच राजकीय पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ता ही आहेत. ते अनेक सामाजिक संस्थांमध्ये उत्तमरीत्या कार्यरत आहेत.
धोपेश्वर येथील अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छां बरोबरच शुभाशिर्वाद सुद्धा दिले आहेत.