
पडळकरांच्या वक्तव्यावर फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
सांगलीच्या जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका केली. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे,” अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली.
गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. या टीकेनंतर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे .
गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत. अतिशय आक्रमक नेते आहेत. अनेकवेळा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल ते लक्षात येत नाही. गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलंय ते योग्य आहे, असं माझंही मत नाही. आणि म्हणून मी गोपीचंद पडळकरांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण विधान केलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. आपण बोलत असताना काय विचार निघतील, याचा विचार करायला हवा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना दिला आहे.
माणसं पाठवली ती कशासाठी? गोपीचंद पडळकरने कधी व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले आहेत का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकर नाही. माझ्यामध्ये कार्यक्रम करायची ती धमक आहे. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?” अशा अर्वाच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला पडळकरांनी टीका केली..
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी केली जात आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका केली. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे,” अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. या टीकेनंतर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे .