
प्रसिद्ध गायकाचं निधन; स्कूबा डाइव्हिंगदरम्यान घडली मोठी दुर्घटना…
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकाच्या निधनाने सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. इमरान हाश्मीच्या गँगस्टर चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘या अली’चा गायक जुबिन गर्ग याचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं.
जुबिन आसाममधील एक नामांकित गायक होता. त्याच्या अपघाती निधनाने अनेकांना जबरदस्त धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील कित्येक कलाकार सोशल मीडियावरुन शोक व्यक्त करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान झालेल्या दुर्घटनेत जुबिन गर्ग याचा मृत्यू झाला. जुबिन याने अचानक घेतलेल्या एग्झिटमुळे चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.
स्कूबा डायव्हिंग अपघातादरम्यान जुबिन गर्गचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, जुबिन एका कॉन्सर्टसाठी सिंगापूरला गेला होता. 19 सप्टेंबर रोजी त्याचा सिंगापूरच्या नॉर्थ ईस्ट फेस्टिवलमध्ये कार्यक्रम होता. त्यापूर्वी तो स्कूबा डायव्हिंग करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यादरम्यान अपघात घडला. यानंतर तातडीने त्याला समुद्रातून बाहेर काढण्यात आलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इंटेनसिव्ह मेडिकल केअर मिळाल्यानंतर डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही. १९ ते २० सप्टेंबरदरम्यान जुबिनचा मृतदेह सिंगापूरहून आसामला आणण्यात येईल. आसाममध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार होईल.
जुबिन गर्ग कोण होता?
भारतीय संगीत क्षेत्रात जुबिनने महत्त्वपूर्ण काम केलं होतं. त्याने आपल्या करिअरमध्ये आसामी, बंगाली, हिंदीसह अनेक भाषांमध्ये काम केलं. ४० भाषांमध्ये त्याने गाणी गायली. यामध्ये कन्नड, नेपाळी, ओडिया, सिंधी, संस्कृत, खासी, मणिपुरी आणि इंग्रजी भाषांचा समावेश आहे.
जुबिन गर्ग याचा जन्म मेघालयातील तुरा राज्यात एका आसामी ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्याचे वडील मोहिनी बोरठकूर एक मेजिस्ट्रेट होते आणि आई ईली बोरठकूर गायक होती. त्याची एक बहीण होती जिचं नाव जोगकी बोरठाकूर. ती एक अभिनेत्री होती. २००२ मध्ये एका कार अपघातात तिचं निधन झालं होतं. गर्गने २००२ मध्येच फॅशन डिझायनर गरिमा सैकियासोबत लग्न केलं होतं.
करिअरमध्ये मोठी कामगिरी
१९९२ मध्ये जुबिन गर्ग एक व्यावसायिक गायक बनला. त्याला वेस्टर्न सोलो परफॉमन्ससाठी गोल्ड मेडल मिळाला होता. नोव्हेंबर १९९२ मध्ये त्याने पहिला अल्बम अनामिका रिलिज केला होता. १९९५ मध्ये जुबिन गर्ग मुंबईला आला होता. येथे बॉलिवूडमध्ये त्याने काम सुरू केलं. आपल्या करिअरची सुरुवात त्याने इंडिपॉप अल्बन चांदनी रातमधून केली. यानंतर त्याने चंदा, गद्दार, दिल से, डोली सजा के रखना, फिजा, कांटे, जाल सारख्या चित्रपटात गाणं गायलं. इमरान हाशमीचा चित्रपट गँगस्टरमध्ये जुबिन गर्गने या अलीने गाणं गायलं होतं. त्यानंतर तो प्रसिद्धीमध्ये आला.
त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. गायक शान यानेही सोशल मीडियावरुन जुबिनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.