
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी पक्षाचे युवा नेते मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली.
विशेष म्हणजे यावेळी मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांना मोठा इशारा दिला. सांगली, कोल्हापूर आणि कराडमधील हॉटेलचा डेटा आपल्याला काढायला लाऊ नको, असा मोठा इशारा मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला. यावेळी मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर अतिशय गंभीर आरोपदेखील केले.
“लोकनेते राजाराम बापू पाटील आणि जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. आमच्या मराठवाड्यात कुत्र्यांमध्ये तीन प्रकार आहेत. भाजपवाले म्हणतात गावाकडची भाषा आहे. खेड्यातले आहेत. आम्ही त्यापेक्षा जास्त खेड्यातले आहेत. आमच्या बीडमध्ये कुत्र्याचे तीन प्रकार आहेत. साधा कुत्रा, पिसाळलेला कुत्रा आणि खर्जुला कुत्रा. तसा हा खर्जुला कुत्रा आहे”, अशी टीका मेहबूब शेख यांनी केली.
हा जयंत पाटील यांच्या आईबद्दल बोलतो. पण जयंत पाटील यांना शिवीगाळ देणं हा केवळ एक बहाणा आहे. खरंतर अवधूत वडारच्या आत्महत्येच्या घटनेला लपवायचं आहे. अवधूत वडारची आत्महत्या का झाली? गोपीचंद पडळकर यांच्या पीएने अवधूत वडारला मारहाण केली. बोगस बिलं लिहायला लावली. एका जिल्हा परिषद सदस्याने दमदाटी केली. त्यामुळे अवधूत वडारने आत्महत्या केली”, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला.
“अवधूत वडारला पोहता येत होतं. पोहता येणाऱ्या माणसाचा मृतदेह पुलापासून 15 फुट वर सापडला आहे. आम्हाला वाटलं आमच्या बीडमध्येच आका आहे. आमचं बीडच बदनाम आहे. हे बीडपेक्षा पुढे आहे. आमदाराच्या पीएचं नाव घेऊ अभियांत्रिकाने आत्महत्या केली. दोन वर्षापूर्वी अमोल करांडे याची जमीन कुणी हडपली? ती जमीन घेतल्यावर त्याचा सुद्धा मृत्यू सेम पद्धतीने झाला. त्याचा मृतदेह देखील अशाच पद्धतीने सापडला. त्यानेदेखील आपली जमीन या खर्दुल्या कुत्र्याला विकली होती. त्याची तुम्ही चौकशी करणार की नाही? 85 वर्षांच्या आजीची जमीन कोणी नावावर करुन घेतली? असे सवाल त्यांनी केले.
माझं या खर्दुल्या कुत्र्याला सांगणं आहे, हॉटेल सोनीमधला 2012 ते 2014 चा डेटा आम्हाला काढायला लावू नको. कोल्हापूरमधल्या हॉटेल सोनीचा डेटा, कराडमधील महेंद्रे हॉटेलचा डेटा आणि सांगली, कोल्हापूरच्या पंचरत्नाचा डेटा काढायला लावू नको. तिथे कुणासोबत कुणी कुणाची आरती केली? हे सांगायची वेळ आणू नको, असा मोठा इशारा मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला.
आम्ही कुणाच्या खाजगी भानगडीत शिरत नाही. पण आमच्या नेत्यावर कुणी बोललं तर सोडत नाही. लयी खाजगी जायला लावलं तर पोखरवाडीत कोणत्या शिक्षकाने काय कारनामे केले ते सांगायची वेळ आमच्यावर आणू नको. पडळकर वाडीत कोण म्हातारा दारु पिल्यावर काय म्हणतो याचा देखील व्हिडीओ समोर आणायला लावू नको. लयी खाजगी जायला लावू नको”, असादेखील इशारा मेहबूब शेख यांनी दिला.