
इमरान खानने तुरुंगातून अक्षरक्ष; पाकिस्तानची काढली इज्जत…
पाकिस्तानची टीम फायनलमध्ये हरली तरी चालेल पण त्यांना भारताकडून पराभव मान्य नसतो. इतर क्रीडा क्षेत्रांच्या तुलनेत खासकरुन क्रिकेटच्या मैदानात भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या खूप जिव्हारी लागतं.
तिथे टीव्ही फोडले जातात. खेळाडूंच्या घरावर हल्ले होतात. सध्या चालू असलेल्या आशिया कप 2025 च्या स्पर्धेत टीम इंडियाने दोनवेळा पाकिस्तानचा दारुण पराभव केलाय. त्यामुळे दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटू तिथल्या टेलिव्हीजन शो मध्ये आपल्या टीमची खरडपट्टी काढत आहेत. आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन इमरान खान यांनी तुरुंगातून पाकिस्तानी राज्यकर्त्यांची आणि व्यवस्थेची अक्षरक्ष: इज्जत काढली आहे. “पाकिस्तानच्या टीमला जर भारताला हरवायचं असेल, तर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी पायाला पॅड बांधून ओपनर म्हणून मैदानात उतरावं” अशा शब्दात इमरान खान यांनी पीसीबीवर हल्लाबोल केला आहे.
इमरान खान हे त्यांच्या काळातील झुंजार क्रिकेटपटू म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानने 1992 साली पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटकडून राजकारणाकडे वळलेल्या इमरान यांनी एकदा पाकिस्तानच पंतप्रधानपद भूषवलं आहे. सध्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं आहे. त्यांच्याविरोधात कोर्टात खटले सुरु आहेत. कारण इमरान खान यांनी पाकिस्तानी लष्कराविरोधात बोलण्याची हिम्मत दाखवली. पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीरसोबत इमरान यांचं पटत नाही. त्यांना तुरुंगात टाकण्यामागे या असीम मुनीरचच कारस्थान आहे.
इमरान यांनी अंपायर म्हणून कोणाला निवडलं?
इमरान खान यांच्यावतीने त्यांची बहिण अलीमा खान हिने सोमवारी प्रसारमाध्यमांना इमरान यांचं मत सांगितंल. इमरान यांच्यामते नक्वी आणि जनरल असीम मुनीर ओपनर म्हणून उतरले तरच पाकिस्तानला भारताला हरवणं शक्य आहे. पाकिस्तानचे माजी मुख्य न्यायाधीश काझी इसा आणि मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान रजा यांनी अंपायर म्हणून काम करावं. इस्लामाबाद हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सरफराझ डोगार यांचं नाव थर्ड अंपायर म्हणून सुचवलं. इमरान खान यांना त्यांची बहिण अलीमा खानकडून पाकिस्तानी टीमच्या लागोपाठ दोन पराभवाबद्दल समजल्यानंतर त्यांनी उपरोधिकपणे अशी कमेंट केलीय.