
दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक शिवारात बुधवारी दिनांक २४/०९/२०२५ रोजी रात्री दोनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर जिवंत गोवंश आणि तेथे सुरू असलेला कत्तलखाना वाडीव-हे पोलिसांनी आज उध्वस्त केला. अंदाजे ३३ लाख ७७ हजार ९०० किमतीचे गोवंश जनावरे, कत्तलीचे साहित्य, गोमांस, रोख रक्कम, २ कार, ३ पिकअप, ४ मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी ७ संशयित आरोपी अटक करण्यात आले असून वाडीव-हे पोलिसांची कारवाई सुरू आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मोठ्या प्रमाणात गावरान जातीची जनावरे बांधून ठेवली आहे. यासह त्यांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नांदगाव बुद्रुक शिवारातील डोंगी परिसरात यशस्वी छापा टाकण्यात आला. या घटनेत जय गोकुळ गुळवे वय २२ रा. नांदगाव बुद्रुक शिवार मूळ राहणार बेलगाव कुहे, अनिल शंकर गतीर वय २७ रा. मुंढेगाव, मोहम्मद अशरफ अली मोहम्मद सैय्यद वय २६ वर्ष रा. नया गाव, अनमोल हॉटेल, मरियम मज्जीद जवळ, शांती नगर भिवंडी, शगफ नवीद नाशिककर वय ३२, रा. नवीन वस्ती पडघा, ता. भिवंडी, गोकुळ बाबुराव गुळवे वय ५२, रा. नांदगाव बुद्रुक शिवार, मूळ राहणार बेलगाव कुन्हे, रतन लक्ष्मण भडांगे वय ३६, मोहन निवृत्ती भडांगे वय २४ दोघे रा. गोरठाण ता. त्र्यंबकेश्वर या ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाडीव-हे पोलीस हवालदार शिरीष मनोहर गांगुर्डे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर, पोलीस हवालदार विशाल सोनवणे, शिरीष गांगुर्डे, नाईक विकास गिते, उल्हास धोंडगे हे कसून अधिक तपास करीत आहेत. दरम्यान सकल हिंदू समाजाच्यावतीने याप्रकरणी सामूहिक निषेध करण्यासाठी बेलगाव कुहे येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर निषेध बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार हिरामण खोसकर, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, राष्ट्रवादी नेते संदीप गुळवे, स्वराज्य जिल्हाप्रमुख रूपेश नाठे, भाजपाचे व्यंकटेश मोरे, छावा संघटना संस्थापक विलास पांगरकर, केशव गोसावी, समाज विकास फाउंडेशनचे तुकाराम सहाणे, मोहन बहे, राष्ट्रवादी नेत्र उमेश खातळे, हरिष चव्हाण, माजी सभापती सोमनाथ जोशी, शेकाप नेते संदीप पागेरे, महेंद्र शिरसाठ, विहिंपचे देवीदास वारुंगसे बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.