
ट्रम्प यांनी ‘या’ देशाला दिली अणुहल्ल्याची धमकी; संपूर्ण जगाची झोप उडाली…
अमेरिका आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनजवळील क्वांटिको मिलिटरी बेसवर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.
या बैठकीला शेकडो जनरल, अॅडमिरल आणि त्यांचे सल्लागार उपस्थित होते. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी रशियाला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. “गरज पडल्यास आमच्याकडे सर्वात आणि सर्वोत्तम अण्वस्त्रे आहेत. मात्र आम्ही त्यांचा वापर करु इच्छित नाहीत.” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘जेव्हा रशियाने अण्वस्त्रांबद्दल विधान केले होते, त्यावेळी अमेरिकेने आपली सर्वात धोकादायक अण्वस्त्र पाणबुडी रशियाजवळ पाठवून त्यांना उत्तर दिले होते. कारण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. आमच्या पाणबुड्या रशिया आणि चीनपेक्षा 20 वर्षे पुढे आहेत. तसेच पुढे बोलताना ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा “कागदी वाघ” असा उल्लेख केला.
पुतिन यांच्याशी झाली होती भेट
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला थेट अणुयुद्धाची धमकी दिली आहे. यातून अमेरिका ही युद्धासाठी तयार असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या दोघांमध्ये अलास्कामध्ये भेट झाली होती, यावेळी ट्रम्प म्हणाले होते की, ‘तुम्ही चार वर्षांपासून असे युद्ध लढत आहात, मात्र हे युद्ध एका आठवड्यात संपू शकले असते.’ यानंतर आता ट्रम्प यांनी म्हटले की, पुतिन यांच्याबद्दल मी खूप निराश आहे. मला वाटले होते की ते हे युद्ध लवकर संपवतील. मात्र तसे झाले नाही.
शस्त्रांची विक्री लवकरच वेगाने होईल.”
ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका लवकरच शस्त्र विक्री पुन्हा सुरू करणार आहे. लवकरच याची घोषणा होईल. कारण अनेक देश अमेरिकन शस्त्रे खरेदी करू इच्छित आहेत, मात्र उत्पादनाला विलंब होत आहे, अनेक देशांच्या ऑर्डर रखडल्या आहेत. काही देश बरीच शस्त्रे खरेदी करत आहेत. यातील बरेच देश हे आमच्यासोबत आहेत.’ दरम्यान ट्रम्प यांच्या विधानावरून आगामी काळात अमेरिका मोठे पाऊल उचलण्याची शक्यता दिसत आहे.