
2029 आधी राहुल गांधी; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ…
देशाच्या राजकारणात सातत्याने केंद्रातील मोदी सरकारआपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही.
अन्य पक्षांच्या मदतीने ही सरकार काम करत आहे. 2029 च्या आधी सरकार कोसळेल असे दावे विरोधी पक्षांकडून केले जात असतात. त्यातच यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वी 75 पूर्ण झाल्याने ते आपले पद सोडणार का? पक्षाचा नियम पाळणार का असे प्रश्न उपस्थित केले जात होते. आता एका कॉँग्रेस नेत्याने राहुल गांधी 2029 आधीच पंतप्रधान होतील असा दावा केल्याने राजकारण पुन्हा तापले आहे.
कॉँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी 2029 आधी राहुल गांधी पंतप्रधान झालेले दिसतील असे म्हटले आहे. विजय वडेट्टिवार हे भंडारा जिल्ह्यात बोलत होते. भंडारा जिल्ह्यात येणारे दिवस हे आपले म्हणजे कॉँग्रेसचे असतील असे विजय वडेट्टीवार म्हणाले. तर 2029 आधी राहुल गांधी आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करतील, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
महायुती सरकारचे घोटाळे जनतेपर्यंत पोचवावेत आणि आपले संघटन वाढवण्यावर भर द्यावा असे मार्गदर्शन विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना केले. विजय वडेट्टिवार यांच्या या दाव्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. खरोखरच केंद्रातील मोदी सरकार 2029 पूर्वी कोसळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
‘या’ नावांना मिळाली सर्वाधिक पसंती
जर का मोदींनी ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्ती घेतली तर, पुढील पंतप्रधान कोण असणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी अनेक नावे सुचवली. मात्र याबाबतच आता इंडिया टुडे सी वोटर या संस्थेने एक सर्व्हे केला होता. त्यामधून कोणाला पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती मिळाली आहे ते, जाणून घेऊयात.
या सर्व्हेमधून जनतेने अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये सर्वाधिक पसंती ही अमित शहा यांना दिली आहे. तब्बल २८ टक्के जनतेने मोदी यांच्यानंतर पुढील पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पसंती दिली आहे.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना देखील जनतेने पसंती दिली आहे. २६ टक्के जनतेने योगी आदित्यनाथ यांना मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पसंती दर्शवली आहे. नितीन गडकरींना 7 टक्के जनतेने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पसंती दिली आहे. त्यामुळे समोर आलेल्या सर्व्हेनुसार तरी मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच जनतेच्या मनातील पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार असावेत असे चित्र दिसून येत आहे.