
घडामोडींना वेग…
अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर भारत रशियाकडून जी तेलाची आयात करतो ते पैसे रशिया फंड म्हणून युक्रेनविरोधातील युद्धात वापरत असल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली आहे. मात्र आता एक गुड न्यूज समोर आली आहे.
ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमध्ये एका मोठ्या डील संदर्भात बोलणी सुरू आहेत, आता लवकरच ही अडकलेली डील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आलं होतं, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आता या डील संदर्भात चर्चा करण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहे, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं होत की, दोन्ही देशांमध्ये व्यापारी डील संदर्भात सुरू असलेली चर्चा सकारात्मक पद्धतीनं पुढे जात आहे. बिजनेस टुडेच्या एका रिपोर्टनुसार आता भारताचं एक वरिष्ठ शिष्ठमंडळ या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये डील संदर्भात बोलणी होणार आहेत, अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर या डील संदर्भातील चर्चेला ब्रेक लागला होता, मात्र त्यानंतर अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतात आल्यानं पुन्हा एकदा या डील संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता टॅरिफच्या निर्णयावर देखील काही सकारात्मक विचार होण्याचे संकेत मिळत आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या या व्यापारी डीलचा मुख्य उद्देश हा 2030 पर्यंत दोन्ही देशामधील व्यापार दुप्पट करणे हा आहे, सध्या अमेरिका आणि भारतामध्ये 191 अब्ज डॉलरचा व्यापार होत आहे, तो 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरपर्यंत पोहचवण्याचं उद्दिष्ट आहे.