
भारताबद्दल केले महत्वाचे विधान ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाकडून आयात होणाऱ्या कच्च्या तेलामुळे चिंतेत आहेत.
त्यांनी मला वचन दिले की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली. भारताने स्पष्ट केले की, भारत बाजाराची स्थिती पाहून निर्णय घेतो आणि प्रत्येक निर्णय भारतीय नागरिकाच्या फायद्यासाठी घेतला जातो. अनेक देशांसोबत भारत करार देखील करतो. मात्र, भारताने कुठेच म्हटले नाही की, आम्ही रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहोत. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तोंडावर पडल्याचे बघायला मिळाले.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर रशिया देखील मैदानात उतरला. रशियाने थेट अमेरिकेला धमकी देत मोठे भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धक्कादायक विधानानंतर मॉस्कोने प्रतिक्रिया दिली. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह म्हणाले की, भारताच्या अर्थव्यवस्थेला रशियन तेलाची नक्कीच आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारत आणि रशियाची एक विश्वासार्ह भागीदारी राहिली आहे. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी एक तृतीयांश आयात रशियाकडून केली जाते.
आम्ही भारतासाठी एक खूप चांगला पर्याय आहोत. रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी जगात स्थिरता आणणारी एक अत्यंत मोठी शक्ती म्हणून पाहिली जाते. मुळात म्हणजे हे नाते मजबूत स्थितीत उभे आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही भारताचे मोठे भागीदार आहोत. अमेरिकेला इशारा देत त्यांनी म्हटले की, ग्लोबल नॉर्थ देश अजूनही शुल्क आणि काही निर्बंध लादत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय.
भारताने गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे. मात्र, याला काही कारण असल्याचे स्पष्ट सांगण्यात आलंय. भारताने इतर काही देशांसोबत बाजारस्थिती पाहून करार केली असल्याचे भारताने स्पष्ट केले. भारतासोबतच अमेरिकेने चीनवर देखील 100 टक्के टॅरिफ लावला आहे.