
काँग्रेस काय घेणार निर्णय?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अशातच, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच ठाकरेंचे खास शिलेदार संजय राऊत यांनी मनसेला महाविकासआघाडीत सामील करण्यासाठी हट्ट धरला आहे.
त्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिले आहे. या पत्रात राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करण्याबाबतची आपली भूमिका मांडली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधीच मनसेसोबत कोणतीही आघाडी नको, अशी ठाम भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही म्हटले होते. मात्र, राऊत यांनी थेट दिल्लीत पत्र पाठवल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
काँग्रेस मतदारांच्या कात्रीत
राज ठाकरे यांनासोबत घेतल्यास परप्रांतीय भाषिक मतदार वर्ग दुखावेल अशी भीतीदेखील काँग्रेस नेतृत्वाला असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद उफाळून आले असल्याचे दिसत आहे.
महाविकासआघाडीत फूट पडण्याची शक्यता
राऊत यांच्या या भूमिकेमुळे आघाडीतील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरें बंधूंमध्ये वैयक्तिक सख्खे संबंध आहेत. अशातच दोन्ही बंधून एकत्र येण्याच्या चर्चेने उत आला आहे. त्यात मनसेला आघाडीत घ्यायचे की नाही? हा प्रश्न. उपस्थित झाला आहे. शरद पवारांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला असला तरी आघाडीत घेण्याची भूमिका मांडलेली नाही. पण काँग्रेसने थेट नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात ेत आहे.