ट्रम्प यांच्या आदेशाने खळबळ; समुद्रात थेट…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. त्य़ांनी काही दिवसांपूर्वी एक हजार उडवून देण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या या आदेशानंतर अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन देशांत तणाव वाढला आहे.
विशेष म्हणजे हा तणाव निवळण्याऐवजी रोजच वाढत जात आहे. आता डोनाल्ड ट्रम्प लवकरच व्हेनेझुएला या देशावर मोठी कारवाई करू शकतात, असा दावा केला जात आहे. कारण ट्रम्प यांनी कॅरेबियन सागरात मोठी युद्धनौका तैनात करण्याचा आदेश दिला आहे.
ट्रम्प यांनी नेमका काय आदेश दिला आहे?
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची विशाल आणि महाकाय अशी USS Gerald R. Ford ही युद्धनौका कॅरेबियन सागरात तैनात करण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही युद्धनौका तैनातही करण्यात आली आहे.
जहाजाचे वजन तब्बल एक लाख टन
हे जहाज एकाच वेळी 90 लढाऊ विमानांना वाहून नेऊ शकते. अमेरिकन सैन्याची ताकद दाखवून देण्यासाठीच ट्रम्प यांनी हा आदेश दिल्याचे म्हटले जात आहे. USS Gerald R. Ford ही युद्धनौका न्यूक्लियर पावर्ड एअरक्राफ्ट कॅरियर आहे. ती साधारण 1100 फूट लांब असल्याचे बोलले जात आहे. यासह अमेरिकन नौदलानुसार या युद्धनौकेचे वजन 1 लाख टन आहे. ही नौका एका तासाला साधारण 34.5 मैल अंतर कापू शकते.
व्हेनेझुएला देशाने काय आरोप केला?
अमेरिकेच्या या आदेशानंतर व्हेनेझुएला मात्र आता अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेला आता युद्ध खेळायचे आहे. त्यामुळेच ही युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी आता कधीच युद्ध करणार नाही, असे सांगितले होते. आता मात्र ते नवे युद्ध सुरू करत आहेत, असेही व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादूरो यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचा काय दावा?
दरम्यान, व्हेनेझुएला या देशाकडून अमेरिकाला युद्ध छेडायचे आहे, असा आरोप केला जात असला तरी अमेरिकेने मात्र आम्ही ही युद्धनौका मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी तैनात केली आहे, असा दावा केला आहे. आमच्या या निर्णयामुळे ड्रग्स तस्करी रोखली जाईल, असा दावा अमेरिकेने केला आहे. पण अनेक तज्ज्ञांच्या दाव्यानुसार व्हेनेझुएला या देशात सत्तापालट घडवून आणण्यासाठीच अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


