जगप्रसिद्ध बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक संत परम पूज्य महंत स्वामी महाराज यांना न्यूयॉर्क शहरात आयोजित ‘फोरम ऑन फेथ 2025’ सोहळ्यात “अचिव्हमेंट इन बिल्डींग बेटर कम्युनिटीज” पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हा प्रतिष्ठीत सन्मान त्यांच्या अढळ जागतिक नेतृत्वासाठी, सामाजिक सद्भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी, कुटुंबांना सक्षम बनवण्यासाठी आणि श्रद्धेवर आधारित सेवेद्वारे समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी दिला आहे.
या पुरस्कारात फोरम ऑन फेथच्या प्रतिक चिन्हांनी सुसज्ज एक आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी संत परम पूज्य महंत स्वामी महाराज यांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी आध्यात्मिक, राजकीय, सरकारी, प्रशासकीय आणि व्यावसायिक नेते आणि आंतरराष्ट्रीय मीडियांच्या उपस्थित हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.हा सन्मान बीएपीएसचे मानव कल्याण आणि एकतेच्या प्रति अपवादात्मक आणि मोजता येण्याजोग्या योगदानाला मान्यता देत आहे.
जागतिक नेटवर्क, जागतिक प्रभाव
महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनांतर्गत बीएपीएसने मानवीय सेवेचा घेरा वेगाने वाढवला आहे आणि आज ही संस्था पाच महाखंडात १,८००हून अधिक मंदिर आणि सांस्कृतिक केंद्रांचे संचालन करत आहे.
ही मंदिरं केवळ उपासनेची स्थळे नाहीत तर जीवनाला समृद्ध करणारी अशी केंद्रे आहेत जेथे लाखो लोक निम्नलिखित माध्यमातून लाभान्वित होत आहेत.
* तरुणांचे चरित्र निर्माण तसेच नेतृत्व विकास कार्यक्रम
* महिलांच्या सशक्तीकरणात पुढाकार
* आरोग्य आणि उपचार सेवा शिबिर
* नशा-मुक्ती आणि मानसिक आरोग्य जागरूकता मोहिम
* शैक्षणिक प्रगती आणि करिअर मार्गदर्शन
* पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपण मोहिम
* जगभरातील आपत्ती निवारण आणि आपत्कालीन मदत
आधुनिक जगात आंतर-धार्मिक सलोखा
दिल्लीतील बीएपीएस अक्षरधाम, न्यू जर्सीतील ( यूएसए ) बीएपीएस अक्षरधाम, आणि अलिकडेच उद्घाटन झालेले अबू धाबीचे बीएपीएस हिंदू मंदिर हे सर्व जगप्रसिद्ध योजना असून ज्यामुळे शांती, एकता आणि सद्भाभावाचे प्रतिक बनले आहे. ही ठिकाण सर्व धर्म आणि राष्ट्रीयतेच्या लोकांचे स्वागत करतात.
सेवेचा शाश्वत दृष्टिकोण
महंत स्वामी महाराज यांचा मार्गदर्शक सिद्धांत – “परहितातच आपले हित आहे” हा प्रेरणादायी विचार जगभराततील एक दशलक्षाहून अधिक स्वयंसेवकांना समाजसेवेसाठा एक समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा देते. आणि हे सिद्ध करते की जेव्हा अध्यात्म मानवतेची सेवा करते तेव्हाच ती तिच्या पूर्णत्वाला प्राप्त करते.
फोरम ऑन फेथ संदर्भात
फोरम ऑन फेथ हे एक प्रभावशाली आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे जे मूल्यांवर आधारित भागीदारी आणि सेवा-केंद्रित सहकार्याद्वारे जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सरकार, धर्म, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणते.
बीएपीएस संदर्भात
बीएपीएस एक प्रतिष्ठित सामाजिक-आध्यात्मिक संघटना आहे. जी सद्भाव, पवित्रता, निस्वार्थ सेवा आणि भक्ती यासारख्या हिंदू तत्वांवर आधारित आहे. ही संस्था जगभरातील लोकांच्या जीवनाला समृद्ध बनवतानाच मजबूत आणि सौहार्दपूर्ण समुदायांची निर्मिती करत आहे.


