 
                शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ‘महाएल्गार’ आंदोलनाला आता आणखी बळ मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे जुने सहकारी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे.
विशेष म्हणजे, जानकरांनी एकेकाळी भाजपसोबत महायुतीत होते. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले जानकर आता सरकारवरच टीका करत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि त्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, या मुख्य मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. “जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार कडूंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेसाठी बच्चू कडू आज मुंबईला रवाना झाले आहेत. संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या या बैठकीत 42 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांनीही काल या आंदोलनात सहभागी होत सरकारवर जोरदार टीका केली आहे. जानकर म्हणाले, “फडणवीसांनी सुरुवात केली, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय शांत बसणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या बैठकीतही जानकर आक्रमक भूमिका घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांनीही काल या आंदोलनात सहभागी होत सरकारवर जोरदार टीका केली आहे. जानकर म्हणाले, फडणवीसांनी सुरुवात केली, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या बैठकीतही जानकर आक्रमक भूमिका घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांनीही काल या आंदोलनात सहभागी होत सरकारवर जोरदार टीका केली आहे. जानकर म्हणाले, “फडणवीसांनी सुरुवात केली, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय शांत बसणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या बैठकीतही जानकर आक्रमक भूमिका घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नागपुरातील आंदोलनानंतर आता हे नेते शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी थेट मुंबईत जाऊन सरकारला जेरीस आणण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी एकत्र येत घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. फडणवीसांचे जुने भिडू आता त्यांच्या विरोधात उभे राहिल्याने, महायुती सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                