रस्त्यावरच झोपली, गाड्यांच्या रांगा; पुढे जे घडलं ते…
एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत राडा घातल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं घडली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही महिला चांगल्या घरातील दिसत आहे.
शिवाय तिने काळ्या रंगाची साडी ही घातली आहे. भर दिवसा तिने मद्य प्राशन केले आहे. तिने इतकी नशा केली आहे की तिला धड चालता ही येत नाही. त्यामुळे थेट ती रस्त्यावर झोपली. लोकांना आधी काय सुरू आहे हे समजलेच नाही. पण खरी स्थिती समोर आल्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक ही हादरून गेले. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी तिची व्हिडीओ ही बनवला. तोच सध्या व्हायरल होत आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. जालना ते खामगाव महामार्गावर चिखली जवळ हा प्रकार घडला. ही मद्यधुंद महिला डुलत डुलत रस्त्यावर आली. ती आधी रस्त्याच्या मधोमध उभी राहील. तिला धड उभं ही राहाता येत नव्हतं. त्यानंतर तिचा तोल गेला ती थेट रस्त्यावर झोपली. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्याचा त्रास झाला. आधी हा संपूर्ण प्रकार लोकांच्या लक्षात आला नाही. त्यांना महिला चक्कर येवून पडली की काय असे वाटले. त्यामुळे काही तरुण तिच्या मदतीला धावले. पण ज्या वेळी ते तिच्या जवळ आले त्यावेळी ती मद्य प्राशन केल्याचे त्यांना समजले.
ती महिला त्या लोकांशी वाद घालू लागली. तिच्या सोबत एक तरुण ही होता. तो ही मद्यधुंद अवस्थेत होता. तो त्याच्या कारमध्ये बसला होता. त्याला लोकांनी तिथेच घेराव घातला. त्याची चौकशी केली. तो पर्यंत त्या महिलेला ही त्या गाडीत टाकण्यात आलं. ती गाडीत टाकल्या टाकल्या तिथेच झोपली. लोकांनी त्या तरूणीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीच सांगत नव्हता. तो ही मद्यधुंद होता. त्याने महिलेला गाडीत टाकली आणि तिथून त्याने पळ काढला.
दरम्यान या मुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाली होता. हा रस्ता रहदारीचा आहे. त्यामुळे तिथे क्षणात मोठी गर्दी झाली. काय झालं आहे हे पाहण्यासाठी लोक जमा झाले. पण त्या तरूणाने त्या महिलेला गाडीत टाकून तिथून पळ काढला. त्यानंतर ही बाब पोलीसांना समजली. गाडीचा क्रमांक लोकांनी पोलीसांना दिला. त्यानुसार त्या गाडीचा आणि त्या दोघांचाही शोध घेतला जात आहे. ती तरुणी आणि त्या युवकाची ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे पोलीस आता ते कोण याचा शोध घेत असल्याचं समजत आहे. पण या गोंधळामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.


