माझी लाडकी बहीण योजनेच्या ई- केवायसी केली नाही, तरी पैसे मिळणार अशी अफवा पसरल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात सध्या माझी लाडकी बहीण योजनेच्या ई- केवायसी प्रक्रियेसाठी महिलांची सेतू केंद्रांवर गर्दी उसळली आहे.
अंतिम तारिख १८ की ३० नोव्हेंबर याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सर्व पात्र महिलांना ई- केवायसी करणे बंधनकारक केले आहे. शासनाने ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती. प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, दि. १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी प्रक्रिया सुरू राहील. विधवा व घटस्फोटित महिलांबाबत अजून शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही.
विधवा, घटस्फोटितांमध्ये चलबिचल
सध्या ई- केवायसी प्रक्रियेसाठी दोन आधारकार्ड आवश्यक असल्याने विधवा आणि घटस्फोटित महिलांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. मृत पावलेल्या पतीच्या आधारकार्डशी मोबाइल नंबर लिंक नसल्यामुळे प्रक्रिया रखडली आहे.
गुगल क्रोमवरुनस्वत:च करा आपली ई- केवायसी
ई- केवायसी करण्याची सोपी पद्धत आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोमवर माझी लाडकी बहीण ई- केवायसी असे शोधल्यास https://ladakibahinyojana.co.in/ekycया संकेतस्थळावर थेट सुविधा उपलब्ध आहे. यात स्वतःचा आणि पतीचा अथवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून घरबसल्या ई- केवायसी करता येते.


