2 लाखांपेक्षा जास्त गुलाबजाम; लाखोंसाठी महाभोजन…
बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदार संघ मोकामा ठरला आहे. या मतदार संघातून जेडीयूचे (JDU) उमेदवार अनंत सिंह विरुद्ध आरजेडी (RJD) उमेदवार वीणा देवी यांच्यात लढत होती.
9 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर जेडीयूचे अनंत सिंग सुमारे 9000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. ढोल-ताशे वाजू लागले आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर ‘जेल का फाटक टूटेगा, मेरा शेर छूटेगा…’ असे लिहिण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या अनंत सिंग यांच्या विजयाची तुफान तयारी करण्यात आली आहे.
अनंत सिंग तुरुंगात
अनंत सिंग यांच्या घरात विजयाच्या जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सुमारे दोन लाख रसगुल्ले बनवण्यात आले आहेत. लाखो लोकांसाठी महाभोजन तयार करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दुलारचंद यादव हत्याकांडात अनंत सिंग हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात बंदिस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पक्षाच्या लोकांनी अनंत सिंग यांच्या नावावर निवडणूक लढवली.
अनंत सिंग यांच्या निवासस्थानी ज्या पद्धतीने विजयाच्या उत्सवाची तयारी केली जात आहे, ते पाहून त्यांच्या समर्थकांना विजयाबाबत खात्री असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच निकाल येण्यापूर्वीच उत्सवाची खास व्यवस्था केली गेली आहे. निकालाच्या वेळी मोकामाहून मोठ्या संख्येने समर्थक पटण्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या जेवण-खाण्याचीही पूर्ण व्यवस्था केली गेली आहे. अनंत सिंग यांच्या निवासस्थानी बुधवारीच तंबू उभारला गेला होता.
2 लाख गुलाबजाम, 12 चुली
गुरुवारी मिठाई तयार करण्यासाठी कारागीर पोहोचले होते. बाहुबली माजी आमदारांच्या निवासस्थानी सुमारे 200 क्विंटल दूध आणि दीड क्विंटल खवा मागवला गेला होता. निवासस्थानासमोर मोठे टेंट उभारले गेले आहेत आणि स्वयंपाकासाठी 12 मोठे चुली सतत पेटलेले आहेत. 2 लाख रसगुल्ले बनवण्यात आले आहेत.
अनंत सिंग यांच्या निवासस्थानी एक पोस्टरही लागलेला आहे, ज्यावर लिहिले आहे, ‘जेल का फाटक टूटेगा, मेरा शेर छूटेगा…’ अनंत सिंग यांच्या घरात विजयाच्या उत्सवाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. सुमारे दोन लाख रसगुल्लेही तयार झाले आहेत. सांगण्यात येते की, दुलारचंद यादव हत्याकांडात अनंत सिंग तुरुंगात बंदिस्त आहेत. ते इतर कैद्यांप्रमाणे एक दिवस कुटुंबीयांशी बोलतात. आता विजयानंतर ते जेलमधून किती वेळासाठी बाहेर येणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


