बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले !
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर नवीन सरकार स्थापनेची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शनिवारी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली.
नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक निकालाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.
या निवडणुकीत जेडीयूने ८५ जागा जिंकल्या, तर चिराग पासवान यांच्या पक्षाने १९ जागा जिंकल्या. दरम्यान, भाजप ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. चिराग पासवान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नीतीश कुमार यांच्या भेटीचे फोटो शेअर केले. “बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, मी आज बिहारचे माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आणि एनडीएच्या प्रचंड विजयासाठी माझे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जनतेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला: चिराग पासवान
चिराग पासवान म्हणाले की, बिहारच्या जनतेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. हा विजय केवळ कोणत्याही पक्षाचा नाही, तर बिहारच्या जनतेचा आणि त्यांच्या शहाणपणाचा आहे. लोक जनशक्ती पक्षाने ज्या आत्मविश्वासाने निवडणूक लढवली त्याचे जनतेने कौतुक केले.’एनडीए युतीच्या काळात बिहारचा विकास वेगवान होईल. राज्यातील तरुण, महिला आणि मागासवर्गीयांसाठी काम करण्यावर असेल, असंही पासवान म्हणाले.
यावेळी चिराग पासवान यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न केला. यावेळी ते म्हणाले, अमित शहा म्हणाले होते की विधिमंडळ पक्ष मुख्यमंत्री निवडेल. त्यांनी सांगितले की त्यांना नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. २०२० च्या निकालांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या पराभवासाठी अनेक लोक जबाबदार होते. जेडीयूशी मतभेद दाखवण्यासाठी, अफवा पसरवल्या जात होत्या, असेही पासवान म्हणाले.


