म्हणाले ‘मला जावं लागेल; मी…
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी न लावल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे वगळता कोणीही या बैठकीला हजर नव्हतं. डोंबिवलीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला भाजपत प्रवेश देण्यात आला.
त्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपाने उमेदवारच पळवल्याने शिवसेनेने कार्यपद्धतीवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना सुनावलं आहे. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही अशा शब्दांत त्यांनी खडसावलं आहे. दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय प्री कॅबिनेटमध्ये घेण्यात आला होता अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीलाही हजेरी लावली नाही.
प्री कॅबिनेट बहिष्कार घालायचं ठरलं?
प्री कॅबिनेटमध्येच आजच्या बैठकीवर बहिष्कार घालायचं ठरलं अशी सूत्रांची माहिती आहे. रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. प्री कॅबिनेट मध्ये यावर शिवसेना मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. आम्हाला जर अधिकार, निधी वाटप, अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील बैठकीला येऊन उपयोग काय? असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी विचारला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे एकटे या बैठकीसाठी निघून गेले. “मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे मी कॅबिनेट बैठकीला जातो,” असं म्हणून शिंदे बैठकीला गेले. भाजपची वाटचाल ही स्वबळावर जायची आहे आणि ते त्याच पद्धतीने वागत आहेत अशी शिवसेना मंत्र्यांची भूमिका आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेला सुनावलं
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रविंद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचं काम रविंद्र चव्हाण करत असल्याची तक्रार केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना सुनावलं. “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका. पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं,” असं मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना सुनावलं आहे.
शिवसेना मंत्री का नाराज आहेत?
1) भाजप सेनेचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत
2) ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उम्मीद्वार ला भाजप आपल्या पक्षात घेत आहे
3) शिंदेच्या अनेक नेत्यांना किव्हा पालकमंत्री ना , विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात किव्हा निधी वळवला जातो
4) येऊ घातलेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही
5) निधी मिळवण्यासाठी ही शिंदेच्या मंत्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
6) संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतलेत ,किव्हा युतीचा धर्म पाळला नाही.


