मोदी सरकारकडून स्पष्टीकरण…
गेल्या काही महिन्यापासून आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. नव्या वेतन आयोगात काय लाभ मिळणार, काय तरतुदी असणार याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असताना महागाई भत्ता, घरभाडे, प्रवास भत्ता मिळणार की नाही, याबाब साशंकता आहे.
याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली आहे. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समिती त्यासाठी कामाला लागली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला मंजुरी दिल्यानंतर समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीला मोदी सरकारने 18 महिन्यांची मुदत दिली आहे. याचाच अर्थ आता नव्या आयोगाच्या समितीला आपला अंतिम अहवाल 2027 च्या मध्यापर्यंत केंद्र सरकारला सादर करावा लागणार आहे.
समितीचा अहवाल उशिरा आला तरी आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या जातील, असे केंद्र सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. नव्या आयोगाची अंमलबजावणी उशिराने सुरू झाली तरी सुद्धा याचा लाभ एक जानेवारी 2026 पासूनच मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना महागाई भत्ता थकबाकीचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नव्या वेतन आयोगात हागाई भत्ता, घरभाडे, प्रवास भत्ता सारखे महत्त्वाचे भत्ते बंद होणार अशा चर्चा सुरु आहे.आता मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांना नव्या आयोगात हे भत्ते मिळणार की नाही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हे भत्ते बंद होणार असल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचे केंद्र सरकारच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नवा आयोग लागू झाला तरीसुद्धा हे भत्ते बंद होणार नाहीत, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
हा भत्ता एक जुलै 2025 पासून प्रभावी आहे. जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता 61 टक्के, जुलै 2026 पासून 64% आणि जानेवारी 2027 पासून 67% इतका होईल अशी माहिती पण समोर आली आहे. 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नव्या आयोगाचा फायदा होणार असून मूळ पगारासह विविध भत्त्यांत मोठी वाढ अपेक्षित आहे.
आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत हे भत्ते सध्याच्याच पद्धतीने सुरू राहणार आहेत.
आयोगाचा अहवाल येईपर्यंत दर सहा महिन्यांनी डीए वाढत राहणार आहे.
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता दिला जातो.
हे आकडे महागाई निर्देशांकावर अवलंबून असणार आहे.


