भारताचा उल्लेख करत CIA च्या माजी पदाधिकार्याचा खुलासा !
अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएचे माजी अधिकारी जॉन किरियाकौ यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी काही खळबळजनक दावे केले होते.
आता पुन्हा एकदा त्यांनी एक नवा खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या पारंपरिक लष्करी शक्तींबद्दल त्यांचे मुल्यांकन बोलून दाखवल्याबद्दल त्यांना इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने त्यांच्यावर कशा प्रकारे माफी मागण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.
किरियाकौ यांनी यावेळी स्पष्ट केले की, पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले माफीची मागणी करणारे पत्र जेव्हा त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देताना आपण हे पत्र टॉयलेट पेपर म्हणून वापरू असे उत्तर दिल्याचे ते म्हणाले. जॉन किरियाकौ यांनी १५ वर्ष सीआयएबरोबर काम केले. सुरुवातीला ते अॅनालिस्ट होते आणि ९/११ हल्ल्यानंतर ते पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी ऑपरेशन्सचे प्रमुख होते.
जॉन किरियाकौ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चाललेल्या चार दिवसांच्या संघर्षानंतर केलेले एक विधान चर्चेत आले होते. ते म्हणाले होते की भारत हा पारंपरिक युद्धात पाकिस्तानला सहज पराभूत करेल. जॉन किरियाकौ वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हणाले होते की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष युद्धामधून कोहीह चांगले निष्पन्न होणार नाही, कारण पाकिस्तान पराभूत होईल. हे इतके सोपे आहे. ते पराभूत होतील. आणि मी अण्वस्त्रांबद्दल बोलत नाहीये. मी फक्त पारंपरिक युद्धाबद्दल बोलत आहे. आणि त्यामुळेच भारतीयांना वारंवार भडकावण्यात कसलाही फायदा नाही.”
किरियाकौ यांनी ऑक्टोबर महिन्यात केलेल्या विधानामुळे त्यांना ऑनलाईन प्रचंड शिवीगाळ करण्यात आली होती. इतकेच नाही तर किरियाकौ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र आले. मार्च २०२३ पासून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही हे पक्षाचे या नेतृत्व करत आहेत.
पत्रात काय म्हटले होते?
या पत्रात किरियाकौ यांच्या वक्तव्याचा आपण शक्य तेवढ्या कठोर शब्दांमध्ये निषेध करत असल्याचे म्हटले होते आणि माजी पंतप्रधान (इम्रान खान). पक्षाचे इतर सदस्य आणि पाकिस्तानचे लोक यांची तात्काळ माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती.
मी म्हणालो एका पारंपरिक संघर्षात भारत पाकिस्तानला पराभूत करले, कारण त्यांच्याकडे पाच पट जास्त लोक आहेत. जीवे मारण्याच्या धमक्या…. मी मोजणे सोडून दिले इतक्या जीवे मारण्याच्या धमक्या मला मिळाल्या. आणि त्यानंतर सर्वात चांगली गोष्ट- माझ्या वकिलाने सांगितलं की, मी ‘लो प्रोफाइल’ राहावे, आजूबाजूच्या परिस्थितीबाबत जरा जागरूक राहावे. त्यानंतर मला इम्रान खान यांच्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र मिळाले. त्या पक्षाचे नाव जे काही आहे, पाकिस्तान… काहीतरी… पक्ष. आणि ते म्हणाले की, मी भारतीयांबद्दल जे काही बोललो, त्याचा ते शक्य तितक्या कठोर शब्दांत निषेध करतात आणि ते मी तातडीने माजी पंतप्रधान, पक्षाचे सदस्य आणि पाकिस्तानच्या लोकांची माफी मागावी अशी मागणी करतात, असे माजी सीआयए अधिकारी किरियाकौ यांनी Julian Doreyयांच्या युट्यूब पॉडकास्टमध्ये सांगितले.


