मुंबई इंडियन्सने तब्बल सहापट पैसे मोजत कोणत्या खेळाडूला संघात घेतलं; नाव ऐकाल तर म्हणाल…
अंबानी यांनी एकदा ठरवलं की ठरवलं, मग ते काही मागे हटत नाही. WPL 2026 च्या लिलावात हीच गोष्ट पाहायला मिळाली. ज्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घ्यायचं नीता अंबानी यांनी ठरवलं होतं.
त्यासाठी नीता अंबानी यांनी तब्बल पाच पट पैसे खर्च केले, पण त्याच खेळाडूला आपल्या संघात घेतल्याचे पाहायला मिळाले.
अंबानी यांनी यापूर्वीच हरमनप्रीत कौर आपल्या संघात कायम ठेवले होते. त्यानंतर काही युवा खेळाडूंना लिलावात संघात घेण्याचा त्यांचा विचार होता. अंबानी यांच्याकडे या लिलावात जास्त पैसेही नव्हते. पण एकदा का ठरवले, तर त्या खेळाडूला कितीही पैसे खर्च करत संघात घ्यायचे हे त्यांनी ठरवले होते. या खेळाडूची बेस प्राईज ही ५० लाख रुपये ठेवलेली होती. मुंबईने ५० लाखांची बोली लावली होती, पण युवा वॉरियर्सच्या संघाने त्यानंतर ६० लाखांची बोली लावली.
मुंबई आणि युपी या दोन्ही संघांत यावेळी चांगलीच चुरस रंगली होती. कारण हे दोन्ही संघ या खेळाडूला संघात स्थान देण्यासाठी एकामागून एक बोली लावत होते. ५० लाखावांरून सुरु झालेली ही बोली अखेर एक कोटीपर्यंत पोहोचली. पण त्यानंतरही या दोन्ही संघांतील बोलीयुद्ध काही थांबवण्याचे नाव घेत नव्हते. कारण एक कोटीच्या पुढेही या दोन्ही संघांमध्ये बोली लागली होती. ही बोली आता थेट दोन कोटींपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आता या खेळाडूला अजून किती बोली लागणार, याकडे सर्व पाहत होते. दोन कोटीवरून थेट तीन कोटीच्या दिशेने ती निघाली. अखेर युपीच्या संघाला हार मानावी लागली आणि त्यानंतर मुंबईच्या संघाने थेट तीन कोटी रुपये मोजत तिला आपल्या संघात दाखल केले. ही खेळाडू होती ती न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर. यापूर्वी ती मुंबईच्याच संघात होती आणि तिला पुन्हा आपल्या संघात स्थान देण्यासाठी त्यांनी तब्बल पाच पट रुपये खर्च केले.
या लिलावात मुंबई इंडियन्सने पहिली खेळाडू तब्बल सहापट कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतल्याचे पाहायला मिळाले.


