दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा – महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील प्रत्येक स्तरावर शोककळा पसरली आहे.
स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोह्यात सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन लोहा नगर परिषदेच्या प्रांगणात बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11: 00 वा करण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक अध्यात्मिक सह विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी जेष्ठ नागरिक यांनी शोकसभेसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती लोहा नगर परिषदेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी केली आहे
