ठाणे (दिवा)-प्रतिनिधी-नागेश पवार – कल्याण लोकसभेचे खासदार (संसदरत्न) डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा आज ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. याच निमित्ताने डॉ. शिंदे यांचा दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर कल्याण लोकसभेचे ‘INFRAMAN’ असा उल्लेख असणारा ४० ते ५० फुटी भव्यदिव्य असा 3D बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः या बॅनरवर करण्यात आलेली रोषणाई ही संध्याकाळ नंतर अधिक प्रभावी वाटतं असल्याने शुभेच्छुक योगेश चंद्रकांत जुईकर यांच्या ह्या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.
