संग्रामपूर / नंदकिशोर शिरसोले..
मानवाचं जन्म हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही अनेक वर्षाच्या तप आणि साधनेतून आपल्याला मानवाचं जन्म ईश्वराने बहाल केला त्यामुळे आल्या जन्मात चांगले कर्म करा हेच आपल्या आयुष्याचे खरे संचित असून शिवपुराण कथा हे संवाद घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन हभप स्नेहगंगाश्रीजी यांनी केले.
येथील पुरातन अशा शिव मंदिर जीर्णोद्धार समितीचे वतीने स्थानिक आठवडी बाजाराच्या मैदानात महाशिवरात्री पर्वावर गेल्या ११ फेब्रु पासून प्रारंभ झालेल्या शिवपुराण कथा सोहळ्यात दुसऱ्या दिवसाचे (ता.१२)पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. आयुष्यात संगत ही अतिशय महत्त्वाची आहे.आयुष्यात कुसंगत लाभली तर आपल्या आयुष्याचे मातेरे होते.आयुष्यात एक चूक आपले पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.विसंगतीने एकाचे चांगले तर दुसऱ्याचे वाईट होते.वादविवाद टाळून संवाद करण्यावर भर द्यावा.संवादातून अनेक जटिल आणि खितपत पडलेले प्रश्न निकाली निघू शकतात.सर्व प्राणिमात्रावर दया करा.खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगून……..सर्वांना प्रेम वाटत चला.आपल्या धर्मावर,देशावर आणि आईवडिलावर प्रेम करा.प्रेमाने सर्व काही साध्य होते असे सांगून ज्या घरातील स्त्री ही दुःखी आणि कष्टी असते तेथे सदैव दारिद्र्य वास करते. स्त्री चा सन्मान करा तीला प्रेम द्या. ज्या घरात नारी हसते हसती खेळती असते तेथे प्रत्यक्षात विष्णूदेव वास करतात.त्या घरात शक्यतो कोणताही वाद नसतो.मानवी जीवनातील चिंता आणि दुःख घालविणारी ही शिव कथा असल्याचे सांगून
आपल्या आयुष्यात संत,ग्रंथ आणि आई वडील हेच आपले खऱ्या अर्थाने दिशा दर्शक असल्याचे सांगितले. संता पासून संस्कार, ग्रंथां पासून विचार तर आई वडिलापासून प्रेरणा घ्यायला हवी असे सांगून शक्तीचे रूप हे गोलाकार असते त्यामुळेच शिवलिंग हे गोलाकार असते.ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जो जप करेल त्याला सर्व सुख समृद्धीचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिशय सुमधुर संचासह ही शिव पुराण कथा येथे सुरू आहे.सकाळच्या सत्रात हभप मनोहर वानखडे आणि बळीराम राजनकर यांच्या वाणीतून शिवलीला अमृत पारायण सुरू आहे. हभप प्रशांत महाराज तायडे यांच्या नेतृत्वात काकडा आरती,हरिपाठ सुरू आहे.तत्पूर्वी कथे साठी तेच आगमन होताच बस स्टँड परिसरात फटाक्यांच्या अतिश बाजीने स्वागत करण्यात आले. टाळ मृदुंगाच्या गजरात ताईचे मिरवणुक काढण्यात आली.ह्या कथा सोहळ्यासाठी अधक परिश्रम रात्र दिवस एक करणारे सुधिरजी मानकर सर सतीश वानखडे, दिलीप राठी,गिरीश राठी,डॉ.गोविंद हुंडीवाले,विजय सावतकर,विजय राजनकर, विनोद राजनकर,वैभव गायकी,अजय मिटकरे,गजानन हुंडीवाले, बादल राजनकर,महेंद्र सावतकर आदीसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
