दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी- बापू बोराटे
पुणे (इंदापूर):-चेतना फाऊंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ लोणेरे रायगढ द्वारे, ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी दिली.
विद्यापीठा द्वारे मार्फत नेमणूक केलेल्या देखरेख समितीच्या पथकाद्वारे सदर सर्वेक्षण दर वर्षी करण्यात येते. देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. त्या वेळी महाविद्यालयाची भव्य व सुसज्ज इमारत, शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, रुग्ण समुपदेशन कक्ष, पायाभूत सुविधा, संगणक कक्ष, महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या पालक सभा, औद्योगिक भेट, परीक्षेच्या निकाल, अनुभवी प्राध्यापक वृंद, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहली, ग्रीन कॅम्पस आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, नोकरी साठीचे नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी कडून मार्गदर्शन, मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहातील दर्जेदार सोयी सुविधा आणि रोजगार मेळावे अशा अनेक उपक्रमांमुळे तसेच निकालातील सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींचा आढावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न. या सर्व क्षेत्रात महाविद्यालयाने साधलेली भरीव प्रगती व गुणवत्ता पाहून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी ‘अ’ श्रेणी प्रदान केली आहे.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे व सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांचे मोठे योगदान असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी सांगितले.
चेतना फाउंडेशनच्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
