नवी दिल्ली : डीआरडीओने विकसित केलेले ध्रुवात्र क्षेपणास्त्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होण्यास सज्ज आहे.हे हेलिकॉप्टरवरून डागल्या जाणाऱ्या नाग रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (एटीजीएम) एक प्रगत आवृत्ती आहे, जे पूर्वी हेलिना म्हणून ओळखले जात होते. हे क्षेपणास्त्र केवळ भारताच्या आत्मनिर्भर भारत अभियानालाच बळकट करणार नाही, तर युद्धभूमीवर, विशेषतः उंच प्रदेशांमध्ये, भारतीय हवाई दल आणि लष्कराची संहारक क्षमता लक्षणीयरीत्या वाढवेल.
ध्रुवास्त्र हे भारताच्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग आहे. याची संकल्पना १९८० च्या दशकात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आली होती.
ध्रुवास्त्रची वैशिष्ट्ये
ध्रुवास्त्रची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तिसऱ्या पिढीची ‘फायर अँड-फॉरगेट’ प्रणाली आहे. एकदा लक्ष्यावर निश्चित झाल्यावर, हे क्षेपणाख आपोआप त्याचा मागोवा घेते आणि त्याला नष्ट करते.
खराब हवामानात आणि रात्रीच्या वेळीसुद्धा, शत्रूच्या रणगाड्यांची उष्णता ओळखून त्यांना अचूकपणे लक्ष्य करू शकते. आधुनिक रणगाड्यांचा वरचा भाग सर्वात असुरक्षित असतो. ध्रुवास्त्र प्रथम उंची गाठते.
ध्रुवास्त्रची मारक क्षमता ७ किमी असून त्याचे वजन ४३ किलो आहे.
हे क्षेपणास्त्र ८००० मिलीमीटर जाडीची स्टील प्लेट सहजपणे भेदू शकते.
या क्षेपणास्त्राच्या मदतीने रणगाड्यांच्या वरचा भागला कमकुवत करणे अगदी शक्य होते. टॉप अटॅकची क्षनता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.
क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी
अलीकडेच, सरकारने १५६ प्रचंड हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. या हेलिकॉप्टरवर ध्रुवास्त्रच्या तैनातीमुळे भारतीय लष्कराला सीमेवरील शत्रुच्या रणगाड्यांविरुद्ध आणि चिलखती वाहनांविरुद्ध निर्णायक फायदा मिळेल, सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारने अंदाजे ७०० कोटी रुपये खर्च करून २०० हून अधिक ध्रुवास्त्र क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली.
प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत १ कोटी रुपयापेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे, याच्या तैनातीमुळे भारताला रशिया किवा युरोपमधून कोनकुर्स आणि मिलान सारखी जुनी क्षेपणास्त्रे आयात करण्याची गरज कमी होईल. ध्रुवास्त्रच्या यशानंतर, डीआरडीओ आता ‘संत’वर काम करत आहे. त्याची मारक क्षमता आणखी जास्त असेल आणि ते मिलीमीटर-वेव्ह रखारसारख्या अधिक प्रगत सेन्सर्सनी सुसज्ज असेल.
