
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मानवी जीवनात दररोज नविन सूर्य उगवतो. प्रत्येक दिवस मानवासाठी काही तरी नव नविन घेवून येतो. त्यात सुख असेल, त्यात दुःख ही असेल. प्रत्येक दिवस काहीतरी नविन्यपूर्ण बाब सोबत घेवून येत असतो. जसं वैयक्तीक जीवन तसंच समुदायिक जीवन असते. समुदायात घडलं की त्याचं बरेवाईट परिणाम आपल्या देशावर ही होतात. कदाचित २४ फेब्रुवारी हा दिवस जगातील देशासाठी आनंदाचा असेल पण युक्रेनसाठी तो काळ्याकुट्ट अंधारी रात्रीचा ठरला. दिवस उगवला तोच बारूदाचा वर्षाव घेवून. असं काय घडलं की रशियाने युक्रेनवर घाला घातला, हल्ला केला.
युक्रेन हा पूर्वीचा सोवियेट युनियनचा भाग. रशियाचं एक समृद्ध राज्य. सोवियेट रशियाला या भागाचा नेहमीच अभिमान वाटावा असा. पण १९९१ च्या सोवियेट रशियन फाळणीने त्यांचात दरार निर्माण झाली. ते वाढत गेली. त्यात अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांनी युक्रेनला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन अमिषाला युक्रेन बळी पडले व स्वतःचा सर्वनाश ओढावून घेतलं. युक्रेनचे सर्वोसर्वा ब्लमिदीर जेंलसकी अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांच्या प्रेमात येवढं गुरफटले की आता बाहेर कसे पडावे हे त्यांना कळत नाही. ते कलाकार असल्यामुळे त्यांना रडता येते. देशाला रडविता येते.
देशवासीयासमोर सर्व नाटकीय पात्रही वटवता येतात पण; जगाला भिक मागून शासन चालवता येत नाही. पण आता जे देशात घडतेय ते भयान सत्य आहे. ते कोणालाही टाळता येत नाही खोटं म्हणता येत नाही. जेंलसकी अमेरिकेच्या बायडयनकीच्या प्रेमात पडले. या ऐंशी वर्षाच्या प्रेमिकेला स्वतःचे काहीच आठवत नाही; बोलता बोलता झोपतात व चालता चालता चालयचा विसरतात असा हा अमेरिकाचा सर्वात पावरफुल माणूस; पण जेंलसकी मात्र दिवा स्वप्न पाहात पाहात ही आफत ओढून घेतली आहे.
जेंलसकी व युक्रेनची अवस्था पाहिल्या नंतर दुध विकणाऱ्या गवळणंची कथा मला आठवली. “एके काळी एक तरुण सुंदर अविवाहीत गवळण दररोज शेजारच्या मोठ्या गावी दुध नेवून विकायची. एके दिवशी ती रस्त्याने एकटीच चालली होती. रस्त्याने जाताना ती विचारात मग्न होती. तिच्या मनात एक विचार आला. आज तिच्या जवळील दुधाला खूप भाव आलं. पुढे असचं दुधाला भाव येत राहिला. खुप पैसा जमा झाला. आत तिच्याकडे एका म्हशीचे दहा वीस म्हशी घरी झाल्या. त्यामुळे भरपूर दुध जमा होवू लागला. आता ती खुप श्रीमंत झाली.
घरी नोकरचाकर आली. आता ती श्रीमंतीचं जीवन जगू लागली. तिला श्रीमंत घरची मुलं लग्नाची मागणी घालू लागले. आता ही श्रीमंत झाल्यामुळे येणाऱ्या मुलांना ती आगदी तोऱ्यात तू मला पसंत नाहीस म्हणून मानेला जोराचा झटका दिला त्या बरोबर तिच्या डोक्यावरील दुधाचे भांडे जमीनीवर पडले व सर्व दुध सांडून गेले.” तेव्हा कुठे ही दिवा स्वप्नातून जागी झाली. असंच स्वप्न जेंलसकीला पडले होते. अमेरिका व नाटो राष्ट्रांनी त्याला दिवा स्वप्नात गुंतून ठेवलं. बायडनकी (जो बायडन) ने जेंलसकीला झुलवत ठेवलं.
युक्रेनचा महापुरुष बनण्यासाठी जेंलसकीने युक्रेनचा सर्वनाश केलेलं आहे हे त्रिकालाबाधीत सत्य ठरणार आहे रशियावर धाक जमवण्यासाठी अमेरिकनधार्जीने राष्ट्रांनी जेंलसकीला काही लालूच दाखवली व त्या लालचीने स्वतःच्या देशाला विनाशाच्या खाईत लोटले.
अमेरिका आणि मित्र राष्ट्राला खरंच युक्रेनचा पुळका आहे का? आजवर तर तो दिसून आला नाही. फक्त स्वतःचा शस्त्रास्त्रांचा बाजार वाढविण्यासाठी. स्वतःच्या फायद्यासाठी व जगात मीच एकमेव महाशक्ती आहे हे दाखविण्यासाठी अमेरिका युक्रेनचा बळी देत आहे. नाटो राष्ट्रांत ब्रिटन ही मी युरोपीय देशात सर्वात महाशक्ती आहे हे दाखविण्यासाठी पुढेपुढे करत आहे.
युरोपात ब्रिटन सरस ठरू पहातोय. अमेरिकेनंतर मीच सर्वशक्तीमान आहे हे ब्रिटश पंतप्रधाना जगाला दाखवून द्यायचे आहे.
अमेरिका, ब्रिटन व इतर मित्र राष्ट्रांनी युक्रेनला मदतीचं कोरडं आश्वासन दिलं. जसं आपल्या खेडेगावात म्हणतात ना “तूझ्या केसाला धक्का तर माझ्या जीवला धक्का” हे जेवढं खोटं आश्वासन तेवढंच खोटं आश्वसन युक्रेनला दिलेलं आहे. मारणारा कोणी केसाला धक्का लावत नाही. तो सरळ गळा चिरतो, हात पाय तोडतो, जीवे मारतो. रशिया तेच करत आहे. तो युक्रेनच्या केसाला धक्का लावत नाही. तसंच अमेरिकेनं युक्रेनचं केलेले आहे. अमेरिकेला जे साधायचं ते तो साधून घेत आहे.
स्वतःची व्यापरी झोळी तो भरून घेत आहे युक्रेनचं बळी देवून. त्याच बरोबर त्याला रशियाला कमजोर करायचं आहे. हेही ते साध्य करत आहेत. पण या युद्धाचे जागतिक परिणाम काय होणार आहेत ते या रक्तपिपासू राष्ट्रांना कळत नाही? त्यांना जगातील इतर देशांच्या हाल अपेष्टा पाहायचे आहे. त्याचा आनंद त्यांना घ्यावयाचा आहे. या युध्दामुळे गरिब देश आणखी गरीब होतील. महागाईच्या झळा जगातील बहुसंख्य देशांना भोगावे लागतील. आपण पहातोय श्रीलंका व पाकिस्तान आताच भोगत आहेत.
जगातील सामन्य लोकांना प्रश्न पडला आहे की जेंलसकी स्वतःच्या मोठेपणासाठी स्वतःच्या देशाला का वेटीस धरत असेल? डोळ्यासमोर हजारो नागरिक, लहान मुलं, वृद्ध नागरिक यांचं बळी जात आहे. सैनिकाला तर (Do or die. Don’t ask why ) करा अथवा मरा का म्हणून विचारायचं नाही . असंच शिकवलेले असते. युद्ध युक्रेन भूमिवर चालू आहे. सामन्य नागरिक मरत आहेत असं युक्रेनचं म्हणन आहे. पण युक्रेनं सामन्य नागरिकांच्या हातात बंदुका दिलेल्या आहेत त्याचं काय? हल्ला तर रशिया करतो व युक्रेनही करतोय. कोणाच्या हल्ल्यात सामन्य नागरिक मरत आहे. युक्रेनला मदत करणारे बाहेर देशाचे सैनिक ही शत्रूला बदनाम करण्यासाठी सामन्य नागरिकांना मारू शकतात गोळ्या घालू शकतात. काहीही असो सर्व विनाश तर युक्रेनचंच होत आहे.
आर्थिक, भौतिक, शैक्षणिक मानसिक नुकसान हे युक्रेनचं होत आहे. अमेरिका युक्रेन नागरिकांना नाही फक्त जेंलस्कीला भडकवत आहे आणि हा बहूरूपी मानुस जगाचा एक महान नेता (इतिहास नोंद घेईल) बनणाच्या इर्षेपायी युक्रेेनचा सर्वनाश करत आहे. या पापाचे वाटेकरी अमेरिका व त्याचे मित्रराष्ट्र आहेत. हे पाप ते रशियाच्या हातून करवून घेत आहेत येवढंच. भारत पाकिस्तान युद्धात १९७१ ला जेव्हा भारताने पाकिस्तानच्या नव्वद हजार सैनिकाला घेरलं तेव्हा पाकिस्तानाच्या प्रमुखांनी लगेच हातात पांढरा ध्वज फडकवला व आपल्या नव्वद हजार सैनिकांचे प्राण वाचवले. हा झाला शहणपणा.
पाकिस्तान ही त्यावेळी रक्ताचा अखेरचा थेंब असे पर्यंत लढू अशी डरकाळी फोडली होती; पण मनुष्यहानी समोर दिसताच शरणागती पत्कारली. असा शहाणपणा जेंलसकीला सूचनार नाही का? आपण पाकिस्तानला एक कमी दर्जाचं बुद्धीहीन राजकर्त्याचे देश समजतो. पण त्यांनी सुद्धावेळेवर शहाणपणा दाखवला होता. असा शहाणपणा जेंलसकी का दाखवत नसेल. याचा अर्थ असा की युक्रेनचा शासन कर्ता हा स्वतःचे निर्णय स्वतः घेवू शकत नाही हेच यावरून दिसून येते. यांना देशाची व आपल्या लोकांची पर्वा नाही असेच दिसून येते.
चला आपण समजू या या लढाईत युक्रेन जिंकला. रशिया हरला. हरला म्हणजे रशियाचं काय नुकसान झालं? युद्धभूमी युक्रेन आहे. माणसं मरत आहेत युक्रेनची, शहरं उद्धवस्त होत आहेत युक्रेनची, सैनिक स्थळ उद्धवस्त होत आहेत युक्रेनची. युक्रेनमध्ये सर्वच बाबतीत बर्बादी चालू आहे. याचं अर्थ रशियाचं काहीच नुकसान होत नाही असं नाही. रशियाचं सैन्य, तोफखाना, विमानं यांच नुकसान होत आहे; पण युक्रेनचं सर्व स्तरांवर नुकसान होत असताना जर जेंलसकी म्हणत असतील की मी शेवटचं सैनिक असे पर्यंत लढणार आहे.
मग कोणासाठी? युक्रेन मध्ये काय शिल्लक राहणार आहे. कोणावर सत्ता गाजवणार आहे? तुमच्या कडे काय शिल्लक राहिल?
महाभारतातील धृतराष्ट्रासारखी जेंलसकीची आवस्था होवू नये. शंभर पुत्र गमवून अंध धृतराष्ट्र स्वतःचा अंहकार सोडला नाही. शेवटी ते वानप्रस्थात गेले. तसंच जेंलसकीचं होवू नये म्हणजे पुरे. रशिया (पुतीन) कधीच मला युक्रेन जिंकायचं आहे असं म्हणलेलं नाही. रशियला फक्त युकेनचं निःशस्त्रीकरण करावयाचं आहे. जमल्यास सत्ताबदल घडावयंच आहे. अमेरिका आणि नाटोना मी दुबळा नाही हे यातून दाखून दायचं आहे. एकटी अमेरिका महासत्ता नाही हेही जगाला दाखवून द्यायचं आहे.
अमेरिकेच्या नादि लागलेल्या देशांची आता पर्यंत राख रांगोळी झालेली आहे. अमेरिका स्वार्थासाठी साथ देते हे जगातील बहुरूंख्य राष्ट्रांना कळून चुकले आहे. ज्या देशाचा शासनकर्ता स्वतःच्या जनतेपेक्षा स्वतःचं मोठेपण जाग ठेवत असेल त्याला महत्व देत असेल तर त्या देशाची हाल युक्रेन सारखंच होणार. बायडेनकीच ऐकून जेंलसकी उड्या मारतो आहे. युक्रेनचे सर्व मित्रराष्ट्र युक्रेनला पाठिंबा देत आहेत. आम्ही तुझे कपडे सांभळतोत तू कस्ती खेळ. रक्त बंबाळ झालास तरी हरलो म्हणू नकोस. जखमा कोणास दाखवू नकोस. तूझं विनाश होईपर्यंत आम्ही तुझ्या पाठिशी आहोत.
वेळेवर नाही पण भविष्यात कधीतरी आम्ही तुझ्या जखमावर फुंकर घालू असं आश्वसन देत आहेत. त्या कोरड्या आश्वासनावर स्वार होवून जेंलसकी आपल्या देशाचं सर्वनास घडवून आणत आहे.
युद्ध थांबविण्यासाठी आज सुमोरासमोर कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. जागतिक शांततेसाठी युनोची स्थापना झाली. पण ही युनो गांधारीचं रूप घेतलेलं आहे. डोळे असून पहात नाही. कान असून ऐकत नाही. तोंड असून बोलत नाही. तरी आता कुठे युनोचे प्रमुख गुटरस साहेब गुटर गुं गुटर गुं करत आहेत. युनो ही संघटना जरी जागतिक शांततेसाठी स्थापन झाली असेल तरी या संघटनेवर विशिष्ट राष्ट्रांचाच प्रभाव आहे. त्यातल्या त्यात ही संघटना अमेरिकाच्या हातातील बाहुलं आहे.
याचं कारण युनोला सर्वात जास्त आर्थिक मदत अमेरिका करते. युद्धाला दोन महिने झाले. युद्ध लांबतंच चाललय. पाश्चात्य मेडिया रशियाला गुन्हेगाराच्या कठडीत उभा करत आहे. जग विनाशाच्या काठावर उभा आहे. कधीही अणुबॉम्बचा वापर होवू शकतो (अशा करू या असं होणार नाही) खरंतर अमेरिका व दोस्त राष्ट्रांनी जेंलसकीला मदत थांबविली तर युद्ध एकाच दिवसात थांबू शकते किंवा जेंलसकीनी स्वतःचा नाटोत जाणाच्या हट्ट सोडला तरी युदध थांबु शकते. रशियाने मोठेपणा दाखवून युद्ध थांबविल्यास जग स्वागतच करेल. पण नखरेल अमेरिका व तिचे साथी असं होवू देणार नाहीत.
युद्ध थांबविण्यात भारतही विश्वगुरुची भूमिका वठवू शकतो. भारतही कणखर भूमिका घेवून रशिया अमेरिका व युक्रेनला युद्ध थांबविण्यासाठी ठणकावून सांगू शकतो व सांगितले पाहिजे. यासाठी भारत अलिप्त राष्ट्रांना सोबत घेतले पाहिजे. पण सध्या थांबा, पहा व निर्णय घ्या या भूमिकेवर आपला देश थांबला आहे. युद्ध थांबवण्याची शक्ती निश्चितच भारताकडे आहे. जगातील अलिप्त राष्ट्राची मोट भारताने बांधून या मुजोर माजूरी राष्टांना धडा शिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा ही जगातील बहुसंख्य राष्ट्रांची अपेक्षा आहे.
©राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड-६
९९२२६५२४०७.