
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
वडेपुरी :- संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथे कार्यरत वडेपुरी चे भूमिपुत्र श्री प्रकाश रामचंद्रराव सुर्वे यांचा राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून राज्य शासनाच्या वतीने आज मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठामध्ये गौरव करण्यात आला. त्यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत तसेच विविध उच्चपदस्थ शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर श्री एम .बी . धूत यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सुर्वे यांचे वडील श्री रामचंद्रराव सुर्वे, रमेश उर्फ बाबुराव सुर्वे (ज्येष्ठ बंधू) तसेच परिवारातील इतर सदस्य, महाविद्यालय आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत एसएनडीटी विद्यापीठ मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या या सन्मानाबद्दल महाविद्यालय परिसर तसेच वडेपुरी आणि पंचक्रोशीत गौरव होत आहे. अशी माहिती रत्नाकर फुलारी यांनी दिली.