
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-व्यवसाय कुठलाही करा,परंतु निवडलेला व्यवसाय पूर्णपणे अंगमेहनतीने झोकून देऊन केल्यास निश्चितपणे भरभराटीस लागतो.त्यासाठी अनुभवीचा अनुभव आणि तज्ञांचा महत्त्वाचा सल्ला द्यावा असे आवाहन प्रशिक्षण कार्यशाळेचे समारोपप्रसंगी मराठावाडा अपंग विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ लोखंडे यांनी केले .
भूम येथील पंचायत समिती सभाग्रहामध्ये जिल्हा उद्योग केंद्र व मराठवाडा अपंग विकास मंडळाचे संयुक्त विद्यमाने अपंग दिव्यांग निराधार परित्यक्त्या व विधवांच्या महिलांना स्वावलंबी करता यावी या हेतूने तीन दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचा समारोप रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी झाला .
या तीन दिवसाच्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये भूम तालुक्यातील जवळपास ६० निराधार परित्यक्त्या, विधवा,अपंग,दिव्यांग,महिलांनी सहभाग घेतला होता .प्रशिक्षण घेण्यासाठी तज्ञ व्यवसायिक तज्ञ आधिकारी पांडुरंग मोरे,चंद्रकांत नलवडे,जिल्हा उद्योग केंद्राचे दत्ता वाघमारे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे,अशोक चव्हाण,विधिज्ञ व्याख्यात्या शुभांगी कुंभार,शंकर खामकर,विलास शाळू,बाळासाहेब क्षीरसागर,आबासाहेब मस्कर,संतोष सुपेकर, श्रीमंतराजे यशवंतराव थोरात,चंद्रमणी गायकवाड आदींनी उपस्थित राहून आवर्जून मार्गदर्शन केले आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी व्यवसायातले बारकावे कथन केले .
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा अपंग विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ अशोक लोखंडे ,सचिव अर्जुन वायकर,सुवर्णा गायकवाड,वैशाली जाधव गणेगाव ,अरुण सोनटक्के, अंकुश शेवाळे महाराज,मराठवाडा अपंग विकास मंडळाचे वाशी तालुका अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले तर पूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन शंकर खामकर यांनी केले .