
दैनिक चालु वार्ता कोरपना प्रतिनिधी-प्रमोद खिरटकर
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे मात्र 3 महिने उलटूनही अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झालेले नाही माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खनिज विकास निधीतून तब्बल नऊ कोटी रुपये खर्च करून सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे भव्य बांधकाम करण्यात आले यासाठी ग्रामपंचायतीने तीन एकर जागा दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागला गेल्या तीन वर्षापासून ताटकळत असलेले बांधकाम अखेर पूर्ण झाले सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने 15 पदाची मंजुरीही दिली परंतु उद्घाटनाचा मुहूर्त मात्र प्रशासनाला मिळालेला नाही याविषयी 26 एप्रिल रोजी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव तथा नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रत्नाकर चटप यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तातडीने आरोग्य केंद्र सुरु करण्याविषयी मुंबई येथे निवेदन दिले येत्या 17 तारखेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु न झाल्यास 17 तारखेला आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे नांदा गावाची लोकसंख्या 10 हजाराहून अधिक असून सदर प्राथमिक आरोग्य केंद्रमुळे लगेचच्या बिबी, नोकारी, पालगाव, हिरापूर, आवारपूर, वडगाव, खिर्डी, राजुरगुडा, लालगुडा, पिंपळगाव आदी पंचकोशितील रुग्णांना आरोग्य सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे नागरिकांच्या हिताच्या या प्रश्नाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.