
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 75 ठिकाणी कार्यक्रमांचे केले आयोजन
नवी दिल्ली :- आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा होणार आहे. त्याची उलट गणतीही साजरी करत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आज सामान्य योग शिष्टाचाराचा (प्रोटोकॉलचा) कार्यक्रम आयोजित केला होता. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या विदेशातील काही ठिकाणांसह दोन्ही मंत्रालयांनी 75 ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. दोन्ही मंत्रालये आणि मंत्रालयांशी संबंधित इतर कार्यालयातील सचिव आणि अधिकारी योग सत्रात सहभागी झाले होते. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी हे नवी दिल्लीतून उपस्थित होते, तर आशियातील पहिल्या आणि जगातील सर्वात जुन्या तेल शुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी)- डिगबोई इथून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली उपस्थित होते.
या वर्षी, स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना, आयुष मंत्रालयाने 13.03.2022 पासून 100 विविध संघटनांच्या सहभागासह 100 दिवसांचा उलट गणतीचा (काउंटडाउन) कार्यक्रम सुरू केला आहे. यासंदर्भात, आयुष मंत्रालयाने समान योग शिष्टाचारावर (सीवायपी) आधारित योगाभ्यासाचा सराव करून आणि इतर संबंधित कार्यक्रम आयोजित करून आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व सोहळा साजरा करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयाला विशिष्ट तारखा देखील दिल्या आहेत .