
दैनिक चालु वार्ता नांदेड – गोविंद पवार
युगपुरुष, थोर समाजसुधारक जागतिक लोकशाहीचे जनक
समतानायक विश्वगुरू विश्वविभूती जगातील प्रथम संसद निर्माते क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची 891 वि जयंती गावात विविध ठिकाणी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती शेकाप युवक जिल्हाध्यक्ष मारोती एजगे यांनी दिली.
सर्व प्रथम जिल्हाध्यक्ष मारोती एजगे, पत्रकार विरभद्र एजगे यांच्या निवासस्थानी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची विधिवत पूजाअर्चा करून सर्व परिवाराकडून अभिवादन करण्यात आले.
बसवेश्वर नगर येथे प्रा. मनोहर धोंडे सर यांचे छोटे बंधू महादू धोंडे यांच्या हस्ते समतानायक क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बसवेश्वर नगर फलकाचे पूजन करण्यात आले.
यावेळी छोटेखानी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महादू धोंडे यांचा सत्कार स्वप्नील कंधारकर, बाबू आप्पा आराळे, संदीपभाऊ एडके यांनी तर पत्रकार गोविंद पवार यांचा सत्कार शिवहार गोकंडे पत्रकार विरभद्र एजगे यांचा सत्कार राजूआप्पा कंधारकर, अरुण राईकवाडे यांचा गौतम एडके सुनील एडके यांनी केला.
यावेळी शेकाप युवक जिल्हाध्यक्ष मारोती एजगे, माजी गटविकास अधिकारी विठ्ठल वाघमारे साहेब, माजी उपसरपंच भगवान आप्पा कंधारकर, बाबूआप्पा आरळे, नागनाथ आप्पा स्वामी, संदीप भाऊ एडके, वंचित बहुजन आघाडीचे राजू अप्पा कंधारकर, प्रा.अनिल धोंडे,रावसाहेब गवते, पत्रकार गोविंद पवार पत्रकार विरभद्र