
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी चंद्रपूर
-प्रदिप मडावी
चंद्रपूर:-
सर्वे नंबर ३१/९३ मध्ये खोटे फेरफार क्रमांक टाकुन फर्जी दस्तावेज तयार केल्याचे आदर्श मिडीया एसोसिएशन तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्यांच्या निदर्शनास आल्यानतंर दिनांक ०९/०३/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक उमेश पाटिल साहेब पोलीस स्टेशन बल्लारपुर यांचेकडे लेखी तक्रार दिली तसेच ३०/०३/२०२२ ला स्मरणपत्र सुद्धा देऊन कारवाई करण्याची विनंती केली परंतु बल्लारपुर पोलीसांकडुन कारवाई तर दुरच राहीली निदान साधी चौकशी सुद्धा करण्यात आली नाही. विचारणा केली असता हा विषय महसुल विभागाचा आहे त्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही हे काम महसुल विभागाचे आहे. असे प्रत्युत्तर दिले. जेव्हा महसुल विभागाच्या उपविभागीय अधिकारी डाँ दिप्ती सुर्यवंशी पाटिल मँडम यांना परस्पर भेटुन सरकारी रेकार्ड मध्ये होत असले खोडतोड व फर्जी रेकार्डची माहीती तसेच सन ०५/०५/१९९० ला कार्यरत नसतांना सुद्धा सध्या साझा क्रं १७ मध्ये कार्यरत असणारे तलाठी चव्हाण यांनी सरकारी पदाचा गैरवापर करत असल्याचे सांगीतले असता त्यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार करा असे बोलल्या यांचा पुरावा आदर्श मिडीया एसोसिएशन कडे उपलब्ध आहे. एकीकडे पोलीस महसुल विभागाकडे बोट दाखवितो तर महसुल विभाग पोलीसांकडे, अजुन पर्यंत कोणत्याही विभागातील अधिकार्यांनी कारवाई केली नाही. परंतु कोणत्याही विभागातील अधिकारी फर्जी कामे करुन आपल्या पदाचा दुरुपयोग करत असेल तिथे पोलीसांनी झालेल्या फर्जी कामाची चौकशी करुन आपले कर्तव्य पुर्णपणे पार पाडले पाहिजे. आजकाल जिकडे तिकडे पोलीसांनी केलेल्या वसुल्यांची बहादुर पणा समोर येत आहे.
कर्तव्यदक्ष असणारे पोलिस अशी बाहदुरी दाखविण्यापेक्षा पदाचा दुरुपयोग करुन भु माफियांना सहकार्य करणार्या सरकारी कर्मचार्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात दाखविली तर, कर्तव्यदक्ष असतांना फर्जी ,बनावटी काम करने बंद होईल तसेच भु माफीयांना सुद्धा भिती निर्माण होईल. बल्लारपुर पोलीस निरीक्षक उमेश पाटिल साहेब यांनी सर्वे नंबर ३१/९३ या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकरणात दोषी लोकांवर कारवाई करायला पाहिजे करीता दिनांक ०२/०५/२०२२ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार साहेब यांना लेखी तक्रार देऊन कारवाई ची मागणी केली आहे. आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा एवं युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपुर विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया झांबरे तसेच आदर्श मिडीया एसोसिएशन चे महाराष्ट्र सचिव युवराज गजभिये यांनी उ. वि. पो. अधिकारी राजा पवार साहेब यांचेशी चर्चा करत असतांना, पवार साहेब यांनी तात्काळ चौकशी सुरु करुन कारवाई करण्यात येईल असे म्हणाले तसे पोलीस निरीक्षक उमेश पाटिल साहेब बल्लारपुर यांना सुद्धा झांबरे यांचे समक्ष सांगीतले. आता युवा स्वाभिमान पक्षाचे लक्ष पोलीस निरीक्षक बल्लारपुर व उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांचे कडे केंद्रित झाले. खरंच पोलीस विभाग दोषींवर कारवाई करणार ?? नाहीतर पोलीस फक्त वसुली करण्यातच मस्त राहणार??? पोलीस विभागाचे वरिष्ठांची भुमीका काय असणार??? आदर्श मिडीया एसोसिएशन तसेच युवा स्वाभिमान पार्टी न्यालयाचा प्रतिक्षेत असल्याची माहिती प्रिया झांबरे यांनी दिलेली आहे.