
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
देहू:- श्री क्षेत्र देहू येथे अखंड हरिनाम सप्ताह व भव्य किर्तन महोत्सवाचे तसेच संगीत गाथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक श्री ह.भ.प.रामेश्वर मी.बिडवे(सातोना) व गाथा पारायण व्यासपीठ नेतृत्व श्री ह.भ.प.महादेव म.इरळदकर आहेत.दि.२४/०५/२०२२ रोजी श्री ह.भ.प.बापुसाहेब म.देहूकर यांचे किर्तन होणार आहे.दि.२५/०५/२०२२ रोजी श्री ह.भ.प.एकनाथ व चत्तर शास्त्री(परभणी)यांचे किर्तन होणार आहे.दि.२६/०५/२०२२ रोजी श्री ह.भ.प.माऊली म.मुडेकर(गंगाखेड)यांचे किर्तन होणार आहे.दि.२७/०५/२०२२ रोजी श्री देवेंद्र म.निढाळ(आळंदी) यांचे किर्तन होणार आहे.दि.२८/०५/२०२२ रोजी श्री ह.भ.प.गुरूवर्य सुदामा बाबा भोसले(घोरवडेश्वर डोंगर) यांचे किर्तन होणार आहे.दि.२९/०५/२०२२ रोजी श्री ह.भ.प. श्रीकृष्ण कृपांकित डाॅ.विकासानंद म.मिसाळ यांचे किर्तन होणार आहे.दि.३०/०५/२०२२ रोजी श्री.ह.भ.प.चांगदेव म.काकडे(कंडारीकर) यांचे किर्तन होणार आहे.दि.३१/०५/२०२२ रोजी श्री.ह.भ.प.गुरूवर्य विष्णूदास नामदेव ढवळे (चारठाणकर) यांचे काल्याचे किर्तन होईल.या कार्यक्रमाचे स्थळ जगद्गुरुज्ञ श्री तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्री क्षेत्र देहू हे आहे.या महोत्सवात सकाळी काकडा भजन ४ ते ६, सकाळी ६.३० ते ९ गाथा पारायण, सकाळी ९ ते १० नास्ता, सकाळी १० ते १२.३० गाथा पारायण, दुपारी १२.३० ते ३ भोजन, दुपारी ३ ते ५ गाथा पारायण, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, रात्री ७ते ९ हरीकिर्तन आणि रात्री १० वाजता हरिजागर अश्याप्रकारे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाची सांगता दि.३१/०५/२०२२ रोजी होणार आहे.