
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी-मिलिंद खरात
ठाणे व पालघर आदिवासी जिल्ह्यात शैक्षणिक कार्य करणारी व गोरगरिबांच्या मुलाना मोफ़त शिक्षण देणारी ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण शिक्षण संस्था .या संस्थे तर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा वाडा येथे संपन्न झाला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ वीरेंद्र भोईर सर यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी .जे .हायस्कूल व आ.ल .चं कनिष्ठ महाविद्यालया चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. आर .एस. पाटील सर यांना शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व श्री एम. एस. देशमुख सर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
सदर पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ वीरेंद्र सर भोईर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
या प्रसंगी कार्यालय अधीक्षक श्री .चंद्रकांत खिरारी साहेब, श्री. अरुण बेनके, श्री वैभव भानुषाली,सौ देशमुख मॅडम , व्ही .टी .मोकाशी सर व इतर मान्यवर उपस्थित होते