
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश नामदेव माने
कर्जाचे पैसे चोरून बॉम्ब तयार केला ! दुसऱ्याच्या नावे व्हॉट्सअप मॅसेज पाठवून सुसाईड बॉम्बरचे पोलिसांना चॅलेंज !!
जालना – मी ISIS सोबत काम करत असून 7 मे रोजी जालना शहराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी व्हॉट्सअप मॅसेजद्वारे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. मी सुसाईडर बॉम्ब असल्याचे सांगून पोलिसांनाही त्याने चॅलेंज दिले आहे.
मै शेख अतिक शेख अय्युब मै एक सुसाईड बॉम्बर हूं मैं इसिस के साथ काम करता हूं 7 मे को मै बॉम्ब फोडने वाला हूं महाराष्ट्र जालना मे पुलिस रोक सको तो रोकला मैं कर्ज चुरा के पैसा जमा करके बॉम्ब बनाया है. या आशयाचा हा व्हॉट्सअप मैसेज पाठवण्यात आला. मुळात शेख अतीक शेख आयुब हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असून त्यांच्या नावाचा वापर करून हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. असे असले तरी पोलिसांनी या मॅसेजला गांभार्याने घेतले आहे.
यासंदर्भात फिर्यादी शेख अतीक शेख आयुब (29 वर्षे, रा. गैबिशहावलीनगर बदनापूर जि. जालना) यांनी बदनापूर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, अनोळखी आरोपीने दि 06/05/2022 रोजी सकाळी 09.56 वाजता फिर्यादी शेख अतीक शेख आयुब हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर आरोपीने त्याच्या मोबाईलवरून main SHAIKH ATIK SHAIKH AYYUB main ek suicide bomber hoon main ISIS ke saath kaam karta hoon 7 MAY ko main bomb fodne wala hoon amaharashtra jalna main police rok sako toh rokla maine loan chura ke paisa jamma karke bomb banaya hain वगैरे मजकुराचा व्हॉट्स अॅप मेसेज पाठवला. (फिर्यादी शेख अतीक शेख आयुब यांच्या नावाने सदर मॅसेजचे प्रसारण करून त्यांचे अब्रु नुकसान केले. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जालना सायबर काईमकडे दिला आहे).