
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
आसा दुधा (खामगाव) दि.७. गेल्या काही दिवसापासून धार्मिकतेच्या विषयावर १४/१५ दिवसापासून रणकंदन माजले आहे आणि यामुळे शेतकऱ्यांकडे माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोलतांना दिसत नाही. यातच एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील भयावह स्थिती दाखवत सरकारसोबत सर्वत्र राजकीय नेत्यांना याचना केली आहे.
खामगाव तालुक्यातील आसा दुधा येथील शेतकरी सुनील पाटील यांनी आपल्या शेतात टरबुजाची लागवड केली होती. मात्र टरबुजाला भाव नसल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे.तर दुसरीकडे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अक्षरशः हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या टरबुजाला त्यांच्या डोळ्यासमोर सडतांना पाहावे लागत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सरकार मायबाप शेतकऱ्यांचे कडे लक्ष देणार का?. असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.