
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गोवा प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
गोवा :-केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज आर्ले मैदान, मडगाव येथे गोवा प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
खेळामुळे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती प्राप्त होते. एवढेच नाही तर युवकांमध्ये मुल्ये रुजवण्याची क्षमता खेळामध्ये आहे, असे प्रतिपादन श्रीपाद नाईक यांनी याप्रसंगी केले. युवा पिढीचा खेळाप्रती कल वाढावा यासाठी शाळा आणि पालकांनी लहानपणापासूनच लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. खेळामध्येसुद्धा करिअर करता येते हे आपल्याला विविध क्रीडापटूंच्या उदाहरणातून दिसून येते, असे ते म्हणाले.
गोवा प्रिमिअर लिग ही तीन दिवसाची क्रिकेट स्पर्धा समरसेट क्लबने आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला पाच लाख रुपयांचे पहिले पारितोषिक तर उपविजेत्यांना 2,50,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरील संघाला 1,50,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.