
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश नामदेव माने
! वेगवेगळी ठिकाणे बदलून गुंगारा देणारा अखेर गळाला, जालना जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई !!
जालना अवैध गर्भपात
जालना, दि. 10 – वेगवेगळी ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देणारा अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार डॉक्टर सतीश गवारेला चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता १३/०५/२०२२ पर्यंत पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
डॉ. अर्चना व्हि. भोसले जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुणालय, जालना यांनी ढवळेश्वर येथे राजुरेश्वर क्लिनीकमध्ये अवैधरित्या गर्भपात होत असल्याचे प्राप्त माहिती वरून दिनांक २९/०४/२०२२ रोजी स्वतः त्यांची टिम, पोलीस व दोन पंचासह ढवळेश्वर येथील राजुरेश्वर क्लिनीकवर छापा मारला होता.
सदर क्लिनीकचा मालक मुख्य सुत्रधार डॉक्टर सतीष गवारे व इतर ०७ आरोपीविरुध्द पोलीस ठाणे चंदनझिरा येथे तक्रार देवून पोलीस ठाणे चंदनझिरा गु.र.नं. १४४ / २०२२ कलम ३१२, ३१३, ३१५, १२० (ब), २०१, ३४ भा.द.वि. सह कलम ३ व ४ वैद्यकिय गर्भपात कायदा १९७१ सह कलम ३३ महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशनर अॅक्ट, सह कलम ३ व ६ गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व दाखल केला आहे. लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ असा गुन्हा दाखल केला आहे.
:सदर गुन्हयांत एकूण आरोपीपैकी ०३ आरोपींना अटक केली आहे. परंतु अवैध गर्भपात करणारा मुख्य सूत्रधार डॉक्टर सतीश गवारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचे साथीदारासह फरार झाला होता. जागा बदलत लपून फिरत होता. त्याचा शोध घेणेसाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आलेले होते. तरी देखील डॉक्टर गवारे हाती लागला नाही.
परंतु दिनांक ०८/०५/२०२२ रोजी फरार डॉक्टर गवारे हा मौजे शेलगाव येथे येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीिस निरीक्षक नाचण यांनी त्यांचे स्टाफसह मौजे शेलगाव येथे सापळा लावला. अवैध गर्भपात करणारा मुख्य सुत्रधार फरार डॉक्टर सतीश गवारे याला ताब्यात घेवून दिनांक ०९/०५/२०२२ रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक १३/०५/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मजुंर केली असून तपास सुरु आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्यार, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मागदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक भुजंग, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे चंदनझिराचे पोलीस निरीक्षक नाचण व स्टाफ यांनी एकत्रीत मिळून केली.