
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील भूमिपुत्र नगरसेवक नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दत्तात्रय वाले यांचा मायभुमी आडगाव त येथे समस्त गावकरी मंडळीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच बालाजी पाटील क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष बालाजी धनसडे ग्रामपंचायतचे उपसरपंच बालासाहेब पाटील क्षीरसागर, प्रभाकर पाटील क्षीरसागर माजी चेअरमन परसराम पाटील क्षीरसागर जयसिंगराव क्षीरसागर ,दशरथ धनसडे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वंभर क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य वसंत धनसडे , गंगाधर पाटील क्षीरसागर, सदाशिव अप्पा होळगे, लक्ष्मण वाले, कैलास पटवे, उमाकांत पा . क्षीरसागर मोहन पाटील क्षीरसागर शिवलिंग स्वामी वैजनाथ क्षीरसागर , ईश्र्वर वाले, कृष्णा क्षीरसागर, पपु क्षीरसागर, काळेश्वर बोमनाळे, शिवानंद भालके,पत्रकार विष्णु धनसडे यांच्यासह गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक मंडळी उपस्थित होते यावेळी सत्कार कार्यक्रमास उत्तर देताना दत्तात्रय वाले म्हणाले की मायभूमीतील नागरिकांनी केलेला सत्कार हा माझ्या जीवनात प्रेरणादायी ठरेल दत्तात्रय वाले यांनी केले व्यक्त केले,मला माझ्या गावाचा सार्थ अभिमान असून लोहा शहराच्या विकास कामासाठी व माय भूमी आडगाव च्या विकासासाठी कटिबद्ध असून मी गाव विकासासाठी माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी प्राप्त करून घेऊन विकास साध्य करेल अशी ग्वाही दिली .यावेळी पत्रकार बालाजी धनसडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की दत्तात्रय वाले हे आमच्या गावाची शान असून त्यांनी माय भूमीच्या विकासासाठी खासदार व आमदार निधीतून जास्तीत जास्त निधी खेचून आणून विकास साधावा दत्तात्रय वाले यांनी 2004 ते 2009 पासून गावात सिंचन व्यवस्था व्हावी यासाठी तत्कालीन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करून साठवण तलावासाठी प्रयत्न केल्याचे सांगून पुढील काळात विकास कामावर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली, यावेळी बालाजी क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार तरुण पत्रकार राम पाटील क्षीरसागर यांनी केलेले कार्यक्रम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज क्षीरसागर , विठ्ठल होळगे राठोड,भगवान क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले