
दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी-विशाल खुणे
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती यांच्या द्वारे झाडांना पाणी घालुन जपली सामाजिक बांधिलकी .
पुणे(देहू भंडारा डोंगर)-
मानवी हक्क संरक्षण व जागृतीच्या वतीने देहू येथील भंडारा डोंगरावर सुकलेल्या झाडांना पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा स्मरून झाडांना पाणी घालण्यात आले. यावेळी बोलताना अण्णा जोगदंड म्हणाले की एकीकडे वाढते शहरीकरण, दुसऱ्या बाजूला वृक्षतोड, शहरीकरणामुळे वाढलेली सिमेंटची जंगले यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. सूर्य आग ओकतोय, पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, उष्माघातामुळे अनेकांना मृत्यु सामोरे जावे लागत आहे. वृक्ष लागवड होते पण त्याचबरोबर संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे.कोरोनाच्या काळात अनेकांना आपले प्राण ऑक्सिजन मुळे गमावले लागले, पर्यावरण दिन हा एक दिवस साजरा न करता वर्षभर वृक्ष लागवड आणि संवर्धन केले पाहिजे कुटुंबाप्रमाणे निसर्ग प्रेम केले पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे (वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे ) या उक्तीप्रमाणे निसर्गाशी आदराने वागावे आज आपण निसर्गाचे संवर्धन व संरक्षण केले तरच पुढच्या पिढीसाठी आपण ऑक्सिजनची सोय केली आहे असे म्हणता येईल असे आण्णा म्हटले.
तसेच आम्हाला झाडांना पाणी घालण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाच्या अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांनी मोफत टॅंकर उपलब्ध करून दिला .
यावेळी विकास कुचेकर , शहराध्यक्ष अण्णा जोगदंड महिला अध्यक्षा मीना करंजावणे, संगीता जोगदंड , मुरलीधर दळवी, संगिता पांचगे, पलानी घाटे, गुणवंत कामगार काळुराम लांडगे,सतिश चव्हाण, ऋषीकेश वाघमारे, सुनील रांजणे, उषा वनस्कर, ईश्वर सोनोने, पंडित वनस्कर, संतोष गावडे, रवी भेंनकी सारंगी कराजावणे इ. सह अनेक पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते.