
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.१५. वैशाखी पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. यानिमित्ताने त तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण सोबत त्यांना बोधीवृक्षाखाली प्राप्त झालेले ज्ञान आधीचे स्मरण संपूर्ण बुद्ध अनुयायांना होते. बुद्ध पोर्णिमेला चंद्र २० टक्के मोठा असतो. हे सुद्धा बुद्ध पौर्णिमा चे खास वैशिष्ट मानले जाते. बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात जंगली प्राण्यांची जनगणना केली जाते. हे बुद्ध पौर्णिमेचे वैशिष्ट होय. गौतम बुद्धाचा जन्म इसवी. सन पूर्व ५६३ वैशाखी पौर्णिमेला झाला. नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये शाक्य प्रांताचे राजा व महाराणी महामाया देवी चे पुत्र म्हणून सिद्धार्थ गौतम जन्मले त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते .पुढे त्यांचा विवाह राजकुमारी यशोधरा सोबत झाला. त्यांना राहुल हा मुलगा झाला. शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये रोहिणी नदी च्या पाण्यावरून नेहमीकरता वाद-विवाद होत होता . एक वेळा वाद एवढा विकोपाला गेला की दोन्हीकडील लोक युद्धासाठी तयार झाले. तथागत गौतम बुद्धांना जेव्हा आहे ही बातमी कळली तेव्हा त्यांनी युद्धाला कडाडून विरोध केला. शाक्य वंशीय गौतम बुद्ध यांनी आपल्या राजदरबाराच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना गृहत्याग करावा लागला. जगात सर्वत्र दुःख पसरलेले आहे.? दुःखाचे नी कारणाचा मार्ग काय ? यासाठी म्हणजे सत्याचा शोधासाठी त्यांनी गृहत्याग पसंद केला. व ज्ञानमार्ग आणि तपश्चर्येचा मार्ग अनुभवला सात वर्षानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाले. तो दिवस वैशाख शुद्ध पौर्णिमाच. एकंदरीत गौतम बुद्धाचा जन्म ज्ञानप्राप्तीचा दिवस आणि त्यांचा महापरिनिर्वाण दिन इसवी सन पूर्व ४८३ कुशिनगर या तिन्ही घटना वैशाखी पौर्णिमेला झाल्या आहेत. त्यामुळे बुद्ध संस्कृतीत वैशाखी पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. बुद्ध पौर्णिमेच्या महान पर्वावर तथागत गौतम बुद्धाचे मानवी कल्याणासाठी सांगितले ज्ञान समजून घेणे, ज्ञानाची दैनंदिन जीवनाशी सांगड घालने आणि मानवी जीवन सुखकर करणे असे संकल्प महत्त्वाचे ठरतात. त्यांनी चार आर्यसत्य सांगितली १) दुःख – तथागत बुद्धाने पहिले आर्यसत्य दुःख सांगितले आहे .जग हे दुःखमय आहे. म्हणजेच जन्म ,व्याधी ,म्हातारपण, मृत्यु, शोक, निराशा हे सर्व दुःखमय आहेत.२) दुःख समुदय (दुःखाचे कारण) – कोणतेही दुःख आपोआप निर्माण होत नाही तर ते काही कारणामुळे उत्पन्न होते . दुःखाचे मूळ कारण म्हणजे तृष्णा, म्हणजेच लोभ किंवा स्वार्थ, लोभामुळे मानवा मानवात, मित्रा मित्रात, पिता-पुत्र आणि राष्ट्र राष्ट्रात भांडणे होतात.३) दुःख निरोध- दुःख ज्या कारणांमुळे निर्माण होते. हे कारण निघून गेले की दुःख नाहीसे होते. म्हणजेच माणसातून तृष्णा, लोभ, आसक्ती आणि स्वार्थ निघून गेले की दुःख नाहीसे होते.४) दुःख निरोधगामिनी पटी पदा – या मार्गाचे आठ अंग आहेत म्हणून त्यांना आर्यअष्टांगिक मार्ग असेही म्हणतात या मार्गाचे पालन केल्याने सर्व प्राणिमात्रांचे कल्याण होते व ते सुखी होतात. या मानवतावादी धम्मा सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना महापुरुष म्हणून जगभर ओळख आहे. बौद्ध धर्मीयांची मोठी संख्या असणाऱ्या जपान, थायलंड, श्रीलंका, चीन ,भारत इत्यादी देशातील लोक बुद्ध पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगभर ओळखल्या जाते .भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती २ मे १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे साजरी झाली होती. तेथूनच भारतात बुद्ध जयंती ची सुरुवात झाली. तर महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ पासून बुद्ध जयंती सुरुवात केली. आणि त्याच्या प्रयत्नानेच २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली . तथागत गौतम बुध्दाच्या शिकवणीनुसार क्रोधाला प्रेमाने पापाला सदाचाराने लोभाला दाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते त्यांनी जगाला विश्वशांतीचा संदेश दिला. बुद्धाच्या याच विचाराने बाबासाहेब प्रभावित होऊन त्यांनी गौतम बुद्ध यांना गुरू मानले. बुद्ध धम्माचे विवेचनात्मक अभ्यास करून स्वातंत्र्य, समतावादी , विज्ञानवादी बुद्ध धम्माचा १९५६ सालि आपल्या लाखो बांधवा सह स्वीकार केला. प्रज्ञा, करुणा आणि समता या तथागत गौतम बुद्धाचे विचार मानवी मूल्य विश्वकल्याणासाठी प्रेरणादायी आहेत. बुद्धाचे हे विचार प्रत्येक मानवाने अंगी करून समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. हीच खरी बुद्ध जयंती साजरी करणे खरे ठरेल. जग मे बुद्ध का नाम है ! बुद्ध भारत की शान एवढे मात्र निश्चित. सर्वांना बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा… मंगल कामना..
सिद्धार्थ अशोक तायडे
मु .पो. वडनेर भोलजी
ता .नांदुरा .जि. बुलढाणा
मो .नं.९३०९७६७३८८